1 आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
2 स्टार प्रवाहवर ‘नशीबवान’ मालिका 15 सप्टेंबरपासून प्रसारित होणार आहे.
3 आदिनाथ ‘रुद्रप्रताप घोरपडे’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आदिनाथ कोठारेनं स्वत:च नाव निर्माण केलय. अशातच आता आदिनाथ प्रेक्षकांचं थोड हटके पद्धतीने मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये आदिनाथ एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
अनेक सिनेमे, दिग्दर्शक करुन आता आदिनाथ पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर नवी मालिका सुरु होत आहे. या मालिकेत आदिनाथ कोठारे मुख्य भुमिकेत पहायला मिळणार आहे. तसंच गंमत म्हणजे या मालिकेचा निर्मता आणि अभिनेता अश्या दुहेरी भूमिका तो साकारताना पहायला मिळणार आहे.
View this post on InstagramA post shared by मराठी Television Information (@marathitvinfo_official)
स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आदिनाथ मालिकेतील मुख्य नायिकेला धडकतो, आणि बघताक्षणी तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर घरातील पुर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्यांचं लक्ष हे त्या मुलीकडेच असतं. त्यानंतर तो मोदकाचा प्रसाद घेऊन तिच्याकडे जातो. तिला मोदक देतो, त्यात नाणं निघतं. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये आदिनाथचा एक वेगळा अंदाज पहायला मिळत आहे.
स्टार प्रवाहवर लवकरच 'नशीबवान' ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत आदिनाथ 'रुद्रप्रताप घोरपडे' ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. आदिनाथसाठी ही मालिका आणि हा अभिनय खास असणार आहे. मालिकेतील व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला की, 'आजवर अनेक मलिकासाठी कधीतरी निर्माता, दिग्दर्शक झालो होतो पण अभिनेता म्हणून ही माझी पहिली मालिका आहे. चित्रपट, ओटीटी माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आणि आता रोज प्रेक्षकांना आपण भेटणार ही भावना खरंच कमाल आहे.'
नशिबवार ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर 15 सप्टेंबरपासून रात्री 9 वाजता पहायला मिळणार आहे. एक आगळी-वेगळी कथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
FAQs
आदिनाथ कोठारेची पहिली मालिका कोणती आहे?
आदिनाथ कोठारेची पहिली मालिका ‘नशीबवान’ आहे.
‘नशीबवान’ ही मालिका कुठे प्रसारित होणार आहे?
ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवली जाणार आहे.
आदिनाथ कोणती व्यक्तिरेखा साकारणार आहे?
तो ‘रुद्रप्रताप घोरपडे’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
‘नशीबवान’ मालिकेची सुरुवात कधी होणार आहे?
15 सप्टेंबरपासून रात्री 9 वाजता ही मालिका सुरु होणार आहे.
गायत्रीचं रहस्य, राहुलचा पर्दाफाश आणि सायलीचा भूतकाळ उलगडणार; मालिकांच्या महासंगमच्या प्रोमोने प्रेक्षक SHOCK !