छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) शैक्षणिक वर्ष २०२५ साठी एमबीबीएस पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नव्याने मंजूर झालेल्या जागांचा समावेश यूजी कौन्सिलिंग २०२५ च्या फेरी-२ मध्ये करता येण्यासाठी दुसरी प्रवेश फेरी २९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, असे वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) कळविले आहे.
केंद्रीय व राज्य कोट्याच्या प्रवेशाची पहिली फेरी २२ ऑगस्टला पूर्ण झाली. या फेरीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) केंद्रीय कोट्यातून ३० पैकी ७ तर राज्य कोट्यातून १७० पैकी १५५ प्रवेश निश्चित झाले.
त्यापैकी ५५ जणांनी रिटेंशन फॉर्म भरून दिले आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
Pune Education : पुण्यात कोरियन 'टोपिक' परीक्षेसाठी अधिकृत केंद्राची स्थापनावाढीव जागांवर प्रवेशासाठी संधी मिळण्यासाठी दुसरी प्रवेश फेरी लांबवण्यात आली. २९ ऑगस्टनंतर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होईल. सुधारित वेळापत्रक एमसीसी लवकरच जाहीर करेल, असे एमसीसीने शनिवारी (ता. २३) जाहीर केले.