Shocking : रत्नागिरी हादरलं! पोटच्या मुलाने आधी केली आईची हत्या, नंतर स्वतःलाही संपवलं
Saam TV August 27, 2025 10:45 AM
  • रत्नागिरी शांतीनगरात मुलाकडून आईचा खून, आत्महत्येचा प्रयत्न.

  • मृत महिलेचे नाव पूजा शशिकांत तेली, आरोपी मुलगा अनिकेत तेली.

  • वडिलांच्या कर्जामुळे निर्माण झालेल्या तणावातून घडली शोकांतिका.

  • पोलिसांचा तपास सुरू, आरोपीवर जिल्हा रुग्णालयात उपचार.

रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांतीनगर परिसरात मुलानेच स्वतःच्या आईची निर्घृणपणे हत्या केली असून त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कुटुंबातील कर्जाच्या ओझ्यामुळे या मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आईचे नाव पूजा शशिकांत तेली असे असून आरोपी मुलाचे नाव अनिकेत तेली आहे.अनिकेत आणि पूजा तेली हे रत्नागिरी शांतीनगर परिसरातील रहिवाशी आहेत. अनिकेत तेली याचे वडील शशिकांत तेली हे सध्या हयात नसून त्यांनी घेतलेल्या कर्जामुळे तो त्रस्त होता. घरात अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणी व कर्जाच्या परतफेडीबाबत तणावाचे वातावरण होते.

Ratnagiri Tourism : रत्नागिरीत वसलेला सीक्रेट समुद्रकिनारा, एकदा पार्टनरला घेऊन तर जा

या तणावातून अनिकेतने आईवर सलग वार केले, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांना समजताच त्यांनी तेली यांच्या घरी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात अनिकेत आणि त्याच्या आईला बघून शेजाऱ्यांनाही धक्का बसला. क्षणाचाही विलंब न करता शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. तसेच अनिकेतला गंभीर जखमी अवस्थेत रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.

Ratnagiri News: समुद्रात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; चार पर्यटकांचा बुडून मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक चौकशीत या हत्येच्या मागे आर्थिक संकटच मोठे कारण असल्याचे पोलिसांना समजले आहे. मात्र नेमके काय घडले, आई-मुलामध्ये काही वाद झाला होता का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.