Ajit Pawar: पुण्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध :अजित पवार, पाषाण, सोमेश्वरवाडीत कामांचे लोकार्पण
esakal August 27, 2025 10:45 AM

औंध : ‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येला न्याय देण्यासाठी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. विकासकामांसाठी राज्य सरकार आणि महापालिका कटिबद्ध आहे,’’ अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली.

पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी परिसरात माजी नगरसेवक प्रमोद निम्हण आणि सुषमा निम्हण यांच्या माध्यमातून केलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, आमदार बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, सुनील शेळके, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे, राहुल बालवडकर, पूनम विधाते, संतोष गायकवाड, दीपक दगडे, सूर्यकांत भुंडे आदी उपस्थित होते. दिवंगत गोविंद निम्हण यांच्या स्मरणार्थ तीन कोटी रुपये खर्च करून स्मशानभूमी बनविण्यात आली आहे. तसेच, पाण्याची टाकी आणि संत तुकाराम शाळेच्या इमारतीचे उद्घाटनही या वेळी झाले.

या वेळी आयुक्त राम यांनी प्रास्ताविक केले. विकासकामांची माहिती माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी दिली, तर माजी नगरसेविका सुषमा निम्हण यांनी आभार मानले.

Pune Police: कोथरूडमध्ये गणित शिक्षकाने पुलावरून नदीत उडी मारत जीव संपवण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या धाडसाने वाचला प्राण वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील

‘‘पीपीपी मॉडेल अंतर्गत १९ कोटी खर्चून उभारलेली संत तुकाराम शाळेची अत्याधुनिक शैक्षणिक इमारत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. नियोजनबद्ध पाणीपुरवठा ही काळाची गरज आहे. हिंजवडी, चाकणमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल,’’ असा इशाराही पवार यांनी दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.