हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये आपलं आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर वास्तूशास्त्रातील नियमांचं पालन केलं तर रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींपासून आपण आपला बचाव करू शकतो. वास्तू शास्त्रानुसार अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण आपण त्या नियमांचे पालन केले तर नक्कीच आपल्याला योग्य ते बदल दिसू लागतात.
वास्तूशास्त्रात, घरात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कधीच रिकाम्या ठेवू नयेत यांच्या संबंधातील नियम देखील सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने घरात वास्तूदोष होणार नाही तसेच नकारात्मक प्रभावांपासून दूर राहाल. हे नियम कोणते ते जाणून घेऊयात.
1. पर्स
वास्तूशास्त्रानुसार, पर्स किंवा पाकिट कधीच रिकामं ठेवू नये. कारण रिकाम्या पाकिटाने पैसा येण्याचा मार्गात अडथळा निर्माण होतो. तुम्हाला आर्थिक समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो. पण, जर तुमची पर्स किंवा पाकिट पैशांनी भरलेलं असेल तर हे आर्थिक समृद्धीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे ते कधीच रिकामे ठेवू नयेत. जर तुम्ही ऑनालईनच व्यवहार करत असाल तर पाकिटात किमान 11 रुपये तरी ठेवावेत.
2. बाथरुमची बादली
आपल्या घरातील बाथरुम ही अशी एक जागा आहे जिथे काय पाण्याचा प्रवाह असतो. वास्तूशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचं प्रतीक मानण्यात आलं आहे. जर तुमच्या बाथरुममधली पाण्याची बादली रिकामी असेल तर त्याच्या आजूबाजूला जल ऊर्जेच्या प्राकृतिक प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ती बादली पाण्याने भरलेलीच ठेवण्याचा प्रयत्न करा
3. रिकामी फुलदाणी
तुमच्या घरातील फुलदाणी ही फक्त घराचं वातावरणच प्रसन्न करत नाही तर तुमच्या नात्यांना देखील फुलवण्याचं काम करते. पण, जर तुमच्या घरातील फुलदाणीच रिकामी असेल तर घरात एक प्रकारे एकाकीपणा येतो. वास्तू शास्त्रानुसार, जर तुमची फुलदाणी रिकामी असेल तर ती तुमच्या नातेसंबंधांतील एकाकीपणा, एकलकोंडेपणा निर्देशित करते. त्यामुळेच घरात कधीच रिकामी फुलदाणी ठेवू नका. त्यात शक्यतो खरी फुले ठेवण्याचा प्रयत्न करा पण जर रोज खरी फुले आणणे शक्य नसेल तर किमान खोटी फुले आणून तरी ठेवावं.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )