Ahilyanagar Traffic : मराठा आरक्षण मोर्चामुळे वाहतूक बदल, अवजड वाहनांना पर्यायी मार्ग, वाचा
Saam TV August 27, 2025 10:45 AM
  • २९ ऑगस्टला आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन होणार

  • राज्यभरातून मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार

  • अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

  • पोलिसांकडून पर्यायी मार्ग निश्चित करून कडक बंदोबस्त

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या २९ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करणार आहेत. आंदोलनात सामील होण्यासाठी विविध जिल्ह्यांतून निघणाऱ्या मोर्चामुळे वाहतुकीवर मोठा ताण येणार असल्याने प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातून २७ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण मोर्चा जाणार असल्याने वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मोर्चा शेवगाव, पांढरीपूल, नगर बायपास, नेप्ती चौक, आळेफाटा या मार्गांवरून जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.

Manoj Jarange Patil : "मराठ्यांना मूर्ख बनवू नका" प्रकाश आंबेडकरांची आंदोलनाआधी मनोज जरांगेंवर टीका

संभाजीनगरहून अहिल्यानगरकडे येणारी वाहतूक नेवासा फाटा, श्रीरामपूर, राहुरी फॅक्ट्रीमार्गे वळविण्यात आली आहे. तर अहिल्यानगरहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना विळद बायपास, राहुरी फॅक्ट्री, श्रीरामपूर, नेवासा फाटा या मार्गांचा वापर करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे शेवगाववरून पांढरीपूलकडे जाणारी वाहतूक कुकाणा, नेवासा फाटा तसेच तिसगावमार्गे वळविण्यात आली आहे. उलट दिशेने, म्हणजे पांढरीपूलवरून शेवगावकडे जाणारी वाहतूक ही जेऊर, कोल्हार घाटमार्गे सोडण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil : ...तर मी सरकारही पाडू शकतो, मनोज जरांगेंची थेट धमकी

वाहतुकीतील या बदलांमुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होणार असली तरी मोर्चा निर्विघ्न पार पडावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष आदेश जारी करताना स्पष्ट केले की, मोर्चा मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.

Manoj Jarange & Nitesh Rane: देवेंद्रजींच्या आईबद्दल अपशब्द काढले तर..वळवळणारी जीभ काढून; नितेश राणेंचा मनोज जरांगेना इशारा|VIDEO

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणात केंद्रस्थानी आहे. समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात मोठी गर्दी उसळणार असून त्याचा परिणाम संपूर्ण राज्याच्या प्रशासनावर व वाहतुकीवर होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.