हिंजवडी : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिंजवडीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी विनंती आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले; अन्यथा गणपतीनंतर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
माण परिसरात १२ ऑगस्ट रोजी प्रवेशबंदी झुगारून आलेल्या अवजड वाहनाच्या धडकेत प्रत्युषा बोराटे या अकरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. खासदार सुळे यांनी सोमवारी (ता. २५) बोराटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, शहरात नियम आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. अवजड वाहनांवरील बंदीचा कोणताही परिणाम दिसत नाही. निष्काळजीपणामुळे निरपराधांचे जीव जात आहेत.
Nagpur Flights: नागपूर मुंबईसाठी नवीन विमान तीन सप्टेंबरपासूनहिंजवडीत अवजड वाहने नियम मोडून रस्त्यावर धावतात. निवासी भागात रेडीमिक्स काँक्रीट प्लांट आहेत. पीएमआरडीएने मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर अजूनही भंगार, राडारोडा आहे. रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. हिंजवडीमध्ये कोट्यवधी रुपयांचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो. इथून कंपन्या परराज्यात जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की, हिंजवडीकडे प्राधान्याने लक्ष घाला; अन्यथा गणपतीनंतर आम्ही आंदोलन करू.
- सुप्रिया सुळे, खासदार