EPFO: ईपीएफओच्या सर्व सुविधा आता फक्त एका अॅपवर; PF क्लेमपासून पासबुकपर्यंत सर्व काम होणार
esakal August 27, 2025 04:45 PM
  • सरकारने उमंग अॅपवर EPFOच्या जवळपास सर्व सेवा उपलब्ध केल्या आहेत.

  • आता घरबसल्या पीएफ क्लेम, पासबुक चेक, यूएएन कार्ड डाउनलोड करता येईल.

  • फेस ऑथेन्टिकेशनमुळे यूएएन जनरेशन आणि अॅक्टिवेशन आणखी सुरक्षित झाले आहे.

  • UMANG App: तुम्ही जर EPFOचे सभासद असाल आणि क्लेम, पासबुक किंवा यूएएन कार्डसाठी ऑफिसच्या फेऱ्या मारत असाल, तर आता ही धावपळ संपणार आहे. केंद्र सरकारने उमंग अॅप (UMANG App) च्या माध्यमातून पीएफशी संबंधित जवळपास सर्व सेवा मोबाईलवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

    घरबसल्या पीएफ क्लेम

    उमंग अॅपवर EPFOक्लेम सेवा उपलब्ध आहे. यामध्ये यूएएन नंबर टाकून सदस्य थेट आपला पीएफ क्लेम करू शकतात. फक्त मोबाईल नंबर आणि MPINची गरज लागते. एकदा लॉगिन झाल्यानंतर घरबसल्या पीएफ क्लेम करणे शक्य आहे.

    क्लेम स्टेटस कळणार

    क्लेम केल्यानंतर त्याचा स्टेटस तपासणे आता खूप सोपे झाले आहे. उमंग अॅपमध्ये फक्त मेंबर आयडी टाकल्यानंतर लगेच स्टेटस दिसतो आणि क्लेम कोणत्या टप्प्यावर आहे हे पाहता येते.

    Pension Reform: पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; UPS मधून NPS मध्ये जाण्याची कर्मचाऱ्यांना एकदाच संधी यूएएन कार्ड आणि पासबुक डाउनलोड

    यूएएन कार्ड अनेकदा नोकरी बदलताना किंवा इतर पीएफ सेवांसाठी लागते. उमंग अॅपवर जन्मतारीख भरून थेट कार्ड डाउनलोड करता येते. तसेच, पीएफ पासबुकमध्ये मागील तीन महिन्यांचे व्यवहार दिसतात. तसेच किती पैसे जमा झाले, ट्रान्सफर झाले आणि सध्याचा बॅलन्स काय आहे हे ही तपासता येते. पासबुक पण PDF स्वरूपात सेव्ह करण्याची सुविधा आहे.

    स्कीम सर्टिफिकेट ऑनलाइन

    नोकरी सोडल्यानंतर पेंशन सेवा जोडण्यासाठी लागणारे स्कीम सर्टिफिकेटही उमंग अॅपवर अर्ज करून मिळवता येते.

    GST Reform: ब्रँडेड मिठाई, फूड प्रोडक्ट आणि कपडे सर्व स्वस्त होणार; किती टक्के GST लागणार? पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय फेस ऑथेन्टिकेशनची नवी सोय

    उमंग अॅपमध्ये आधार आधारित फेस ऑथेन्टिकेशन टेक्नॉलॉजी (FAT) सुरू करण्यात आली आहे. यामुळे यूएएन जनरेशन व अॅक्टिवेशन आणखी सुरक्षित झाले आहे. नव्या यूएएनसाठी किंवा आधीच मिळालेल्या यूएएनला अॅक्टिव करण्यासाठी ही सोय उपयुक्त ठरणार आहे.

    थोडक्यात, आता पीएफसाठी ऑफिसमध्ये धावपळ करण्याची गरज नाही. उमंग अॅपने EPFOच्या जवळपास सर्व सेवा तुमच्या मोबाईलवर आणल्या आहेत.

    FAQs

    Q1. उमंग अॅपवर कोणत्या सुविधा मिळतात?
    - पीएफ क्लेम, पासबुक, यूएएन कार्ड डाउनलोड, क्लेम स्टेटस ट्रॅकिंग, स्कीम सर्टिफिकेट अर्ज.

    Q2. उमंग अॅपवर क्लेम कसा करायचा?
    - यूएएन नंबर, मोबाईल नंबर आणि MPIN टाकून लॉगिन करून थेट क्लेम करता येतो.

    Q3. यूएएन अॅक्टिवेट करण्यासाठी नवी सोय काय आहे?
    - आधार आधारित फेस ऑथेन्टिकेशन टेक्नॉलॉजीद्वारे यूएएन जनरेशन आणि अॅक्टिवेशन.

    Q4. पासबुकमध्ये काय दिसते?
    - मागील तीन महिन्यांचे व्यवहार – जमा झालेले पैसे, ट्रान्सफर आणि बॅलन्स.

    Q5. उमंग अॅपवर स्कीम सर्टिफिकेट मिळते का?
    - हो, नोकरी सोडल्यानंतर पेंशन सेवा जोडण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.