छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर विकासासाठी १५६ कोटी ६३ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यात मंदिर परिसराच्या आतील भागाचे सुशोभीकरण व सुधारणेसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आणखी ८० कोटींच्या प्रस्तावासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांची मंजुरी घेण्यात आली असून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
त्यानुसार २३६ कोटींचा खर्च होणार आहे. मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देऊन प्रस्तावित कामे ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. मंदिराच्या आतील परिसर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यासाठी केंद्र व राज्य शासनाची संयुक्त परवानगी घेऊन आतील सभामंडपाचे काम केले जाणार आहे.
तसेच बाहेरील अतिक्रमित असलेली दुकाने व रस्ते यांच्या विकासासाठी तसेच इतर कामांसाठी १५६ कोटी ६३ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु, या आराखड्यामध्ये मंदिराच्या आतील परिसराचा विकास व सुशोभीकरणाचा प्रस्ताव नव्हता; मात्र नव्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आला असून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
Indian Football Squad : भारताचा फुटबॉल संघ नव्या आव्हानासाठी सज्ज; नेशन्स करंडक, सुनील छेत्रीला स्थान नाहीचश्री घृष्णेश्वर मंदिराच्या आतील परिसराचा विकास व सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेचमंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेताना काही नियम आहेत. त्यामुळे भाविकांची तारांबळ उडते. त्यामुळे बाह्यदर्शन अथवा इतर काही व्यवस्था करण्याबाबत समितीने विचार करून प्रस्ताव दिला तर प्रशासन त्यावर विचार करेल.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी