सेन्सेक्स 258 अंकांनी आणि निफ्टी 68 अंकांनी घसरून बाजार लाल रंगात उघडला; आयटी, फार्मा आणि रिअल्टी क्षेत्रावर सर्वाधिक दबाव.
अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% अतिरिक्त टॅरिफ लावले, ज्यामुळे MSME आणि छोट्या उद्योजकांवर परिणाम होणार आहे.
ग्लोबल मार्केट अस्थिर, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
Stock Market Opening Today: आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 258 अंकांनी घसरून 81,377 वर उघडला तर निफ्टी 68 अंकांनी घसरून 24,899 वर सुरू झाला. बँक निफ्टीदेखील 140 अंकांनी घसरून 54,999 वर पोहोचला.
टॅरिफ वाढीच्या भीतीमुळे जवळपास सर्वच सेक्टर्स लाल रंगात आहेत, मात्र FMCG सेक्टरमध्ये खरेदी दिसून आली. फार्मा, आयटी आणि रिअल्टी सेक्टरमध्ये सर्वाधिक दबाव होता. निफ्टी फार्मा इंडेक्स तब्बल 1% पेक्षा जास्त कोसळले.
टॅरिफ बनला बाजाराचा खलनायकअमेरिकेने भारतातून होणाऱ्या आयातीत 25% अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली असून आता एकूण टॅरिफ 50% पर्यंत पोहोचणार आहे. हे टॅरिफ बुधवारीपासून लागू होईल. या निर्णयाचा मोठा फटका लघुउद्योग आणि MSME क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की लघुउद्योग आणि शेतकऱ्यांचे नुकसान कोणत्याही परिस्थितीत होणार नाही.
जागतिक बाजारात खळबळजागतिक बाजारातही खळबळ दिसून येत आहे. GIFT निफ्टी 50 अंकांनी घसरून 25,950 वर पोहोचला. निक्केई 400 अंकांनी खाली घसरला तर अमेरिकन बाजारातही प्रॉफिट बुकिंग झाली. डाऊ 350 अंकांनी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला तर नॅसडॅक 50 अंकांनी खाली गेला.
परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) मंगळवारी एकूण 1,400 कोटी रुपयांची विक्री केली. मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांनी(DIIs) पुन्हा खरेदीला सुरुवात केली आणि 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
MSCI इंडेक्समध्ये बदलआज बाजार बंद झाल्यानंतर MSCI India Standard Index मध्ये बदल होणार आहेत. यात Swiggy, Hitachi Energy, Waaree Energies आणि Vishal Mega Mart यांचा समावेश होणार असून Thermax आणि Sona BLW बाहेर जातील. या बदलांचा थेट परिणाम संबंधित शेअर्सवर दिसणार आहे.
सरकारी बँकांचा हिस्सा विकणारसरकारने UCO Bank, Central Bank, Punjab & Sind Bank आणि IOB या चार सरकारी बँकांमधील 5% हिस्सेदारी विक्रीसाठी सल्लागार नेमले आहेत.
SBI Credit Card: SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 तारखेपासून नियम बदलणार; कोणते फायदे मिळणार नाहीत? IPO मार्केटमध्ये काय चाललयं?आज Shreeji Shipping, Vikram Solar, Gem Aromatics आणि Patel Retail यांची लिस्टिंग होणार आहे. तसेच Vikran Engineering चा IPO उघडणार असून याचा प्राइस बँड ₹92–97 निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय Sai Life Sciences मध्ये 2,640 कोटी रुपयांची ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे.
ऑटो सेक्टरसाठी मोठा दिवसपंतप्रधान मोदी आज Maruti Suzuki ची पहिली ग्लोबल इलेक्ट्रिक कार e-VITARA ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कंपनीही कार युरोप, जपानसह 100 हून अधिक देशांत निर्यात करणार आहे.
FAQsQ1. आज शेअर बाजारात किती घसरण झाली?
- सेन्सेक्स 258 अंकांनी आणि निफ्टी 68 अंकांनी घसरले.
Q2. कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक दबाव दिसला?
- आयटी, फार्मा आणि रिअल्टी क्षेत्रात सर्वाधिक विक्रीचा दबाव होता.
Q3. अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाचा भारतावर काय परिणाम होणार?
- MSME आणि छोट्या उद्योजकांवर थेट परिणाम होईल, कारण आयातीत वस्तूंवर 50% पर्यंत टॅरिफ लागू होईल.
Q4. ग्लोबल मार्केटची स्थिती कशी आहे?
- निक्केई 400 अंकांनी घसरला, डाओ 350 अंकांनी पडला, तर कच्चे तेल 68$/बॅरलवर पोहोचले.
Q5. IPO मार्केटमध्ये कोणत्या कंपन्या चर्चेत आहेत?
- Shreeji Shipping, Vikram Solar, Gem Aromatics आणि Patel Retail लिस्टिंगसाठी, तर Vikran Engineering IPO ओपनसाठी चर्चेत आहेत.