मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’चा नारा देत मुंबईच्या दिशेने आगेकुच केली आहे. आता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक निघाले आहेत.शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी आपण २९ ऑगस्टच्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनासाठी बीड येथून मोठ्या संख्येने मराठा आरक्षण आंदोलक समर्थक लोक निघाले असल्याचेही त्यांनी सांगितले. बजरंग सोनावणे यांच्या पीएने पैसे बुडवल्याचा आरोप झाला आहे. त्याबद्दल विचारले असता त्यांनी तुम्ही माझा माझा पीए म्हणून का बोलत आहात. हा कर्मचारी जिल्हा परिषदेचा निवृत्त कर्मचारी असून त्याने याआधीच कोणाचे तरी ते पैसे घेतलेले होते. त्याआधी तो कोणाचा पीए होता. हे देखील पाहिले पाहिजे असेही ते म्हणाले.