गणेशोत्सवावर पावसाचं सावट.
महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा सक्रिय, कोकण-घाटमाथा-विदर्भात पावसाचा जोर.
साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.
महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भ या भागांत पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिक यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत परभणी आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यावरून राज्यात पावसासोबतच उकाड्याचे प्रमाणही जाणवत असल्याचे स्पष्ट होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे मॉन्सूनला पुन्हा बळ मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार सरी सुरू झाल्या असून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Monsoon Update : मुंबईत पावसाची दांडी, विदर्भात आज विजांच्या कडकटासह तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत देखील पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता असून, या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Monsoon Update : तीन दिवसात राज्यात जोरदार पाऊस; मुंबई, ठाण्याला झोडपणार, वाचा कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्टदरम्यान, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत तुरळक पावसाबरोबर विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कायम राहतील.
Monsoon Songs: 'भिजून गेला वारा...' धो धो बरसणाऱ्या पावसात वेळ काढून ऐका ही ५ गाणीहवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मॉन्सूनला पुन्हा एकदा जोर मिळालेला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.