अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने अनेक वर्षांचे चांगलेच संबंध ताणल्याचे बघायला मिळतंय. आता अमेरिकेतील एका धक्कादायक घटनेने हृदय हेलावून गेलंय. मिनियापोलिसमधील एका कॅथोलिक चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या मुलांवर आणि काही वृद्धांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. हेच नाही तर या गोळीबारात दोन चिमुकल्या मुलांचा जीव गेला आणि 17 जण गंभीर जखमी आहेत. हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव रॉबिन वेस्टमन आहे. त्याने हा हल्ला करण्याच्यापूर्वी धक्कादायक व्हिडीओ देखील केला. ज्यामुळे भारताच्या नावाचाही समावेश होता.
या हल्लेखोराने हल्ला करण्याच्या अगोदर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये शस्त्रांवर लिहिण्यात आले होते की, ‘न्यूक इंडिया’ म्हणजे भारतावर परमाणू हल्ला करा. फक्त भारतच नाही तर अनेक देशांबद्दल अशाप्रकारचा मजकूर हा लिहिण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनाही मारून टाका, असेही लिहिण्यात आले. मुलांसाठी, तुमचा देव कुठे आहे? असेही बरेच त्याने लिहिले होते. आता हा संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.
भारत आणि अमेरिकेत अगोदरच तणावाची स्थिती असताना असा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणानंतर गुन्हा दाखल केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्यावर मोठे भाष्य करत दु:ख व्यक्त केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला म्हणजे मानवतेवर हल्ला असल्याचे स्पष्ट शब्दात म्हटले. अमेरिकेतील या हल्ल्याची जगभरात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अनेकांनी या हल्ल्याची निंदा केली असून जखमींसाठी प्रार्थना केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात दोन मुलांचा जीव गेलाय, त्यांचे वय 8 ते 10 वर्षाच्या आतमध्येच आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्लेखोर चर्चशी संबंधित एका शाळेतील माजी विद्यार्थी होता. 2017 पर्यंत तिथेच शिकला. मात्र, आपण ट्रान्सजेंडर असल्याचे त्याने जाहीर केले आणि त्याला कायदेशीररित्या त्याचे नाव बदलावे लागले. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध हा घेतला जात आहे.