शरीर निरोगी आणि तंदुरस्त राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी योग्य असाव्या लागतात. तर यासाठी अनेकजण त्यांच्या आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करत असतात. जसे की काजू, नट्स, बदाम, पिस्ता. कारण यातील पोषक तत्व शरीराला पुरेसं पोषण देतात. तर या ड्रायफ्रुट्समधील पिस्ता हा एक महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. तर हा पिस्ता आपण अनेकदा नाश्त्यामध्ये ओट्स किंवा ड्रायफ्रुट्समध्ये मिक्स करून सेवन करत असतो. तर अनेक प्रकारच्या मिठाई आणि पेस्ट्रीमध्ये देखील पिस्त्याचा वापर केला जातो. त्यातच पिस्ता हा इतर ड्रायफ्रुट्सपेक्षा महाग आहे. परंतु त्यात आढळणारे पोषक घटक आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊया की पिस्ता खाण्याचे आरोग्यास कोणते फायदे होतात.
– पिस्ता आरोग्यासाठी इतर ड्रायफ्रुट्सपेक्षा जास्त फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन बी6, प्रथिने, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
– पिस्त्याचे सेवन अनेक आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मदत करतात. कारण यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. पिस्त्याचे सेवन केल्याने निद्रानाश, भूक न लागणे, लठ्ठपणा आणि संधिवाताच्या आजारांपासून आराम मिळतो. हृदय आणि त्वचेशी संबंधित आजारांसाठी देखील हे फायदेशीर मानले जाते.
– गर्भवती महिलांसाठी पिस्त्याचे सेवन खूपच फायदेशीर मानले जाते. यातील पोषक तत्व महिलांना गर्भावस्थेत फायदेशीर ठरतात. यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड गर्भवती महिलांसाठी आणि त्यांच्या बाळांसाठी फायदेशीर ठरतात.
– पिस्त्यामध्ये प्रोटिन्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे आपल्या शरीरात नवीन रक्ताच्या पेशींची वाढ होण्यास आणि मासंपेशींच्या विकासात मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर पिस्ता हे हेल्दी स्नॅक्स म्हणून आहारात समावेश करू शकतात.
तज्ञांच्या मते, पिस्ता खाण्यापूर्वी ते पाण्यात भिजवा आणि नंतर सेवन करा. कारण पिस्त्याचा स्वभाव उष्ण आहे, म्हणून ते मर्यादित प्रमाणात सेवन करा, किंवा मिठाई व इतर पदार्थांमध्ये मिक्स करून त्याचे सेवन करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)