गणेशोत्सवासाठी गावी जाताना दाम्पत्य बेपत्ता झाल्याची माहिती समोर आलीय. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर इथं शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे पत्नी आणि दोन मुलांसोबत गावी निघाले होते. पण चिपळूण नंतर त्यांच्याशी काहीच संपर्क झाला नाहीय. त्यामुळे कुटुंबिय चिंतेत आहे. ज्ञानेश्वर हे मूळचे हिंगोलीचे असून ते मंगळवारी गुहागरमधून निघाले होते. त्यांचं शेवटचं लोकेशन मंगळवारी सायंकाळी चिपळूण इथं आढळून आलं.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर हे गुहागर इथं शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गणेशोत्सवासाठी ते पत्नी अन् मुलांसह गावी निघाले होते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ते चिपळूणमध्ये होते. तेव्हा त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. तेव्हापासून पती-पत्नीचे फोन बंद आहेत.
चिपळूणमध्ये मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर चव्हाण आणि त्यांचे कुटुंबिय पोहोचले होते. त्यानंतर ते पुढे कुठे गेले, काय झालं? याची माहिती समजू शकलेली नाही. त्यांचे फोन बंद असून २४ तास त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय गुहागरच्या दिशेने निघाले आहेत. मित्र आणि नातेवाईकांकडेसुद्धा चौकशी करण्यात आलीय. पण कुणाशीच त्यांचा संपर्क झालेला नाही.
चव्हाण कुटुंबिय त्यांच्या कारने हिंगोलीला निघाले होते. कारही कुठे सापडली नसल्यानं आता गूढ वाढत चाललं आहे. चव्हाण कुटुंब नेमकं कुठं गेलं याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान,गाडी किंवा त्यांना कोणी पाहिले असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे कळकळीचे आवाहन चव्हाण यांच्या कुटुंबियांनी केले आहे. या कठीण प्रसंगात मदत करण्यासाठी भारत देवकांत पाटण (संपर्क: 9850277942) आणि अभिजित गोळे सर (संपर्क: 8975732094) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.