दुलीप ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरच्या वेगवान गोलंदाज आकिब नबीने कमाल केली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी असलेला ईस्ट झोन संघाची दाणादाण उडाली. त्याने फक्त 28 धावा देत 5 गडी बाद केले. तसेच या स्पर्धेत डबल हॅटट्रीक घेत इतिहास रचला. आकिबने 5 पैकी 4 विकेट या सलग घेतल्या. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत केली नव्हती. त्यामुळे अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. नॉर्थ झोनने प्रथम फलंदाजी कताना 405 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ईस्ट झोन संघाची दाणादाण उडाली. अवघ्या 230 धावांवर संपूर्ण संघ तंबूत गेला. नॉर्थ झोनने पहिल्या डावात 205 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे मजबूत स्थितीत असून विजयाच्या आशा वाढल्या वाढल्या आहेत. नॉर्थ झोनसाठी आकिब नबीने कमाल केली.
आकिब नबीला 53वं षटक टाकण्यासाठी बोलवलं. त्याने या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट सिंहला तंबूचा रस्ता दाखवला. अर्धशतकी खेळीनंतर त्याला तंबूत परतावं लागलं. त्यानंतर आलेला मनीषीला आला तसा तंबूत पाठवला. शेवटच्या चेंडूवर मुख्तार हुसैनला बाद केलं आणि पहिली हॅटट्रीक घेतली. 55 वं षटक टाकण्यासाठी पुन्हा आकिब आला आणि पहिल्याच चेंडूवर सूरज सिंधू जयस्वालची विकेट काढली. यामुळे त्याच्या नावावर सलग चार विकेट झाल्या. त्याने डबल हॅटट्रीक घेण्याचा कारनामा केला. क्रिकेटमध्ये सलग तीन विकेटसाठी हॅटट्रीक आणि चार विकेटसाठी डबल हॅटट्रीक बोललं जात. ईस्ट झोनचे शेवटचे 5 गडी फक्त 8 धावांवर बाद झाले.
ईस्ट झोनच्या 222 धावा असताना विराट सिंह बाद झाला होता. 230 धावा होता होता सर्व संघ तंबूत परतला. आकिब नबी व्यतिरिक्त हर्षित राणाला दोन आणि अर्शदीप सिंगला एक विकेट मिळाली. आकिब दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सलग चार विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारताच्या देशांतर्गत क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी फक्त चार गोलंदाजांना करता आली आहे. सर्वात आधीच दिल्लीचा गोलंदाज शंकर सैनीने 1988 मध्ये हिमाचलविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्यानंतर 2018 मध्ये जम्मू काश्मीरच्या मोहम्मद मुदहसिरने आणि मध्य प्रदेशच्या कुलवंत खेजरोलियाने ही कामगिरी केली आहे.