मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले.
हजारो मराठा बांधवांनी मुंबईत मोठी गर्दी केली आहे.
'आरक्षण मिळेपर्यंत हलणार नाही' असा जरांगे यांनी सरकारला इशारा दिला.
आंदोलकांना शांततेत राहण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे जरांगेंचे आवाहन.
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर दाखल होत आमरण उपोषणाला सुरूवात केली. उपोषण सुरू करताना त्यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले. 'सरकारने सहकार्य केले आणि आपणही त्यांना सहकार्य करू. कुणीही जाळपोळ आणि दगडफेक करायची नाही. पोलिस बांधवांना सहकार्य करायचे.', असे सांगत मनोज जरांगे यांनी सर्वांना संयम ठेवण्यास सांगितला. 'आरक्षणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही.', असे देखील आवाहन मनोज जरांगेंनी सर्वांना केले.
मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावरून सांगितले की, 'माझ्या आमरण उपोषणाला १० वाजल्यापासून सुरूवात झाली. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलो आहोत. गडबड गोंधळ करू नका. आपण शिकलो नाही. आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्याला ७० वर्षे काही मिळाले नाही. आपला समजात कसा मोठा करता येईल, त्यासाठी आपल्याला आता पर्यंत्न करायचे आहेत.'
Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल! मनोज जरांगेंचे जोरदार शक्तिप्रदर्शनसरकारने सहकार्य केल्याबद्दल जरांगेंनी त्यांचे आभार मानत सांगितेले की, 'आपलं मुंबईत यायचे ठरलं होतं. आझाद मैदानात उपोषण करायचं हे ठरलं होतं. त्याप्रमाणे आपण इथे आलो आणि आपलं उपोषण सुरू आहे. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हते म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि मुंबई जाम करणार होते आणि मुंबई जाम केली पण. आता सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे परवानगी दिली. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुकही केले. आता आपली जबाबदारी आहे. आपणही सहकार्य करूया.'
CM Eknath Shinde: कायदा कोणीही हातात घेवू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची: मुख्यमंत्रीजरांगेनी मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले की, 'कुणी जाळपोळ दडगफेक करायची नाही. सोमवारी-मंगळवारी महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केले तर मुंबईमध्ये पुन्हा यायचे. आरक्षणाची जबाबदारी माझ्याकडे, शांततेत राहून सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची.'
राज्यभरातील मराठा बांधव वाहनांनी मुंबईत आले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यावर जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन करत सांगितले की, 'आपल्याला रस्त्यावरील वाहनं काढायची आहेत. पार्किंगमध्ये पोलिस सांगतील तिथे लावायची. स्वत: तुम्ही स्वंयसेवक म्हणून काम करायचे. दोन तासांत मुंबई रिकामी झाली पाहिजे. उपोषणाला बसल्यानंतर मला बोलता येणार नाही. पोलिस नाराज झाले नाही पाहिजे, वाहतूक कोंडी झाली हे ऐकायला आलं नाही पाहिजे. आपण आझाद मैदानात यायचे होते आलो. समाजाची मान खाली जाईल असे वागू नका.'
Manoj Jarange Biography : शिक्षण सोडलं, हॉटेलवर काम केलं, सामान्य कार्यकर्ता झाला मराठ्यांचा सरदार, मनोज जरांगेंचा धगधगता प्रवासआरक्षण घेतल्याशिवाय इथून हालणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. ते म्हणाले की, 'डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हालायचे नाही. मराठ्यांची मान खाली जाईल, असे कुणीही वागायचे नाही. कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. समाजाला कुटुंब मानलेय. मी तुमच्या कुटुंबातील आहे, तर माझा शब्द खाली पडू देऊ नका. मी कुटुंबासाठी लढतोय. माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाज उभा राहिला पाहिजे. जे मैदान दिलेय, तिथेच राहायचे अन् झोपायचे. मी आझाद मैदानावर आहे, म्हटल्यावर तुम्ही घरात निवांत झोपा.'
Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुस्लिम आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा; आरक्षणासाठी ताफा मुंबईकडे|VIDEO