झ्युरीच : यंदा दोहा डायमंड लीगमध्ये ९१.०६ मीटर भाला फेकून नीरजवर मात करणाऱ्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरने पहिल्याच प्रयत्नात ९१.३७ मीटर फेक केली आणि प्रथमच डायमंड लीगचा विजेता होण्याचा मान मिळविला.
यामुळे भारताचा दोन वेळचा ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न सलग तिसऱ्या वर्षीही पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, शेवटच्या प्रयत्नात त्याने ८५.०१ मीटर फेक करून दुसरे स्थान प्राप्त केले.
वेबरने धमाकेदार सुरवात केल्याने नीरजवरील दबाव वाढला होता. त्यातच नीरजची सुरवात आशावादी नव्हती. त्याच्या फेकीत वेग दिसून आला नाही. पहिल्या प्रयत्नात तो फक्त ८४.३५ मीटर अंतर गाठू शकला. दुसऱ्या प्रयत्नात वेबरने ९१.५१ मीटर अशी आणखी एक जबरदस्त फेक करीत आपले विजेतेपद निश्चित केले.
ही त्याची कामगिरी १४ वी सर्वकालीन सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात नीरजची आणखी घसरण झाली. तो ८२ मीटरच भाला फेकू शकला. तिसऱ्या प्रयत्नात नीरजचा फाऊल झाला. या धक्यातून तो शेवटपर्यंत सावरू शकला नाही. सहा प्रयत्नापैकी तो तीनच फेक यशस्वीपणे करू शकला. विशेष म्हणजे आज वेबर वगळता एकाही स्पर्धकाला आपल्या सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.
Asian Hockey Trophy 2025: विश्वकरंडकाच्या तिकिटासाठी आजपासून झुंज; आशियाई हॉकी करंडक, यजमान भारताचा सलामीचा सामना चीनशीनीरजने दोहा डायमंड लीगमध्ये ९०.२३ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती. आजच्या वेबरच्या कामगिरीमुळे टोकियोत होत असलेल्या जागतिक स्पर्धेत सहभागी होताना नीरजवरील दबाव आणखी वाढलेला असेल. २०१२ च्या ऑलिंपिक विजेत्या त्रिनिदादच्या केशॉर्न वॉलकॉटने ८४.९५ मीटरसह तिसरे स्थान मिळविले. गतविजेता अँडरसन पीटर्सची चौथ्या स्थानावर घसरण झाली.