आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आनंदाची बातमी, या महिन्यापर्यंतच राहणार टॅरिफचे संकट, डोनाल्ड ट्रम्प यांना दणका
GH News August 30, 2025 11:16 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवरून संपूर्ण जगाला वैठीस धरले आहे. टॅरिफ लावण्याची धमकी देऊन ते काही अटी आणि शर्ती मान्य करून घेत आहेत. भारतावर 50 टक्के टॅरिफ त्यांनी लावलाय. शिवाय आमच्या अटी मान्य केल्या नाही तर अजून टॅरिफ वाढवला जाईल, असे सांगितले जात आहे. फक्त भारतच नाही तर जगातील इतर काही देशांवर देखील त्यांनी मोठा टॅरिफ लावला आहे. अमेरिकेच्या विरोधात इतर देश एकजूट होताना दिसत असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरीला आणि त्यांच्या टॅरिफच्या हत्याराला कुठेतरी लगाम बसताना आता दिसतोय. मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांना बसला आहे.

जगासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या विरोधात एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली. या याचिकेवर यूएस कोर्टात सुनावणी झाली आणि फक्त ऑक्टोबरपर्यंत हा टॅरिफ असेल त्यानंतर टॅरिफ काढण्याचा निर्णय थेट कोर्टाने दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्षाला काही महत्वाचे अधिकार असतात पण टॅरिफ लादण्याचा नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

कोर्टाच्या या निर्णयानंतर जगात आनंदाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दादागिरी करून अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे. शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध हे वाईट होताना सध्या दिसत आहेत. हेच नाही तर सातत्याने अमेरिकेकडून भारताबद्दल वादग्रस्त विधाने ही केली जात आहेत. कधी टॅरिफच्या महाराज तर कधी रशियाचे कपडे धुण्याचे मशिन भारताला अमेरिकेकडून बोलले जात आहे.

अमेरिका पाकिस्तानच्या माध्यमातूनही भारतावर दबाव टाकण्याचे प्रयत्न करताना दिसली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला कोणत्याही प्रकारची भीक भारताने घातली नाही. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर गेले. जपाननंतर ते चीनच्या दाैऱ्यावर असणार आहेत. मधल्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा फोन देखील केला. मात्र, मोदी यांनी त्यांच्या फोनला कोणताही प्रतिसाद हा दिला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.