गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. "आम्ही एकत्रितपणे भारतातील लोकांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यांचे मार्गदर्शन अमूल्य आहे आणि मी आपल्या राज्यांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी त्यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे."; असे राणे यावेळी म्हणाले.
गणेशोत्सवानिमित्त्य पताकांतून साकारला मत्स्यअवतारनागझर- कुर्टी येथील नाईक कुटुंबियांनी पताकातुन साकारला मत्स्यअवतार. एकूण ९५ डजन पताकाचा केला वापर.
vasco: वास्कोत अपार्टमेंटच्या २ बाल्कनी कोसळल्यावास्कोतील हॅप्पी अपार्टमेंटच्या दोन बाल्कनी कोसळल्या. आमदार कृष्णा साळकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
Matoli: माटोळीत साकारले ऑपरेशन सिंदूरपिळये-धारबांदोडा येथील देऊ शेटकर यांनी माटोळीत साकारली ऑपरेशन सिंदूरची आकृती. माटोळीत एकूण ३६० फळाचा समावेश.
विजय सरदेसाई यांनी दारू तस्करीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलेगोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी वित्त सचिवांना पत्र लिहून दारू तस्करीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. हा मुद्दा त्यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. गोवा हा दारू तस्करीसाठी राष्ट्रीय स्तरावर ओळखला जाऊ लागला असून ही बाब राज्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
Bandora: कदंब बस मागे घेत असताना टायर गेला गटारात, वाहतुकीवर परिणामनावतवाडा-बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिर जवळ कदंब बस मागे घेत असताना बसचा टायर गटारात गेल्याने वाहतुकीवर परिणाम. सर्व प्रवाशी सुखरूप.
जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी