Guarantee Free Govt Loan: कोरोना काळात लाखो छोटे विक्रेते बेरोजगार झाले होते. अशावेळी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी योजना)’ सुरू केली. या योजनेअंतर्गत गॅरंटीशिवाय कर्ज दिले जाते. आतापर्यंत या योजनेतून 80 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते, मात्र आता मोदी सरकारने ही मर्यादा वाढवून 90 हजार रुपये केली असून योजनेची मुदत 2030 पर्यंत वाढवली आहे.
3 टप्प्यात मिळणार कर्जया योजनेतून लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्ज मिळेल –
पहिल्या टप्प्यात 15,000 रुपये,
दुसऱ्या टप्प्यात 25,000 रुपये,
तर तिसऱ्या टप्प्यात 50,000 रुपये कर्ज दिले जाईल.
यामुळे छोटे व्यवसाय उभे करण्यास मोठी मदत होणार आहे. ठरावीक वेळेत हप्ते भरल्यानंतरच पुढच्या टप्प्याचे कर्ज उपलब्ध होईल.
Gold Rate Today: सोनं 3,300 रुपयांनी महागलं; भाव 1 लाख रुपयांच्या पुढे; चांदीच्या भावात मात्र घसरण, कारण काय? आधार कार्ड पुरेसेया योजनेत कर्जघेण्यासाठी कोणतीही हमी द्यावी लागत नाही. फक्त आधार कार्ड दाखवून कर्ज मिळू शकते. घेतलेली रक्कम एका वर्षात परतफेड करता येते तसेच ईएमआयची सुविधाही आहे.
अतिरिक्त सुविधाजे लाभार्थी वेळेत कर्ज फेडतील त्यांना यूपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड मिळेल.
डिजिटल पेमेंट प्रोत्साहनासाठी 1,600 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे.
सरकारच्याआकडेवारीनुसार 30 जुलै 2025 पर्यंत 68 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना 13,797 कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आणखी 50 लाख नवीन लाभार्थी जोडले जाणार असून एकूण 1.15 कोटी विक्रेत्यांना याचा फायदा होणार आहे.