स्पर्धा परीक्षा देवून युवा प्रशिक्षणार्थिंनी शासनात यावे
esakal August 30, 2025 10:45 PM

- rat२९p५.jpg-
२५N८७८६६
रत्नागिरी ः समाजकल्याण कार्यालयात अकरा महिने काम केलेल्या युवा प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्र देताना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते.

स्पर्धा परीक्षेतून प्रशिक्षणार्थींनी शासनात यावे
प्रशांत सातपुते ः युवा प्रशिक्षणार्थींचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून साहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात केलेल्या कामामुळे निश्चितच लाभार्थ्यांना फायदा झाला असेल. त्यांच्या समाधानाची, आशीर्वादाची, पुण्याईची शिदोरी जीवनात निश्चितच उपयोगी ठरेल. स्पर्धा परीक्षा देऊन युवा प्रशिक्षणार्थींनी शासनामध्ये यावे. शंभर दिवस उपक्रमात साहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्ह्याला मान मिळाला आहे. तो त्यांनी कायमस्वरूपी टिकवून ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
समाजकल्याण कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथील कार्यालयात अकरा महिने काम केलेल्या युवा प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्र देऊन निरोप देण्यात आला. या वेळी साहाय्यक आयुक्त दीपक घाटे, गृहपाल रवींद्र कुमठेकर, प्राची विचारे, तालुका समन्वयक अमोल पाटील, गजानन जळके, उमेश अष्टुरे आदी उपस्थित होते. तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनाही प्रशस्तिपत्र देण्यात आले.
या प्रसंगी घाटे म्हणाले, युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी या विभागात उत्तम काम केले आहे. इथला अनुभव त्यांना निश्चितच जीवनात उपयोगी ठरेल. तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना या ज्येष्ठांसाठीच्या योजनेमध्ये त्यांचे सहाकार्य, योगदान उल्लेखनीय राहिले आहे. चांगला अभ्यास करून स्पर्धा परीक्षा द्यावी आणि शासनामध्ये कायमस्वरूपी यावे. नीटनेटकेपणा, स्वच्छता हा केवळ शंभर दिवस शासनाचा उपक्रम न राहता सर्वांनी त्यामध्ये सातत्य ठेवावे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.