गेवराई : दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी सुरु असल्याने पैठणतील जायकवाडीत वरिल धरणातून पाण्याची आवक वाढली आहे.यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात जवळपास पाऊण लाखाहून आधिक क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने गेवराईतील ३२ गावातील नागरिकांनी पुराची धास्ती घेतली आहे.
मराठवाड्याचे वैभव असलेल्या पैठण (जि.छत्रपती संभाजीनगर)येथील जायकवाडी धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे.मागील दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी सुरु आहे.
परिणामी जायकवाडीच्या वरिल धरणातून जायकवाडीत पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी धरणाच्या अठरा दरवाजे साडेतीन फुटाने उघडून गोदावरी नदीच्या पात्रातुन जवळपास ७८ हजार क्युसेकने पाणी विसर्ग होत असून, यामुळेच गेवराईतील नदीच्या काठावरील ३२ गावातील नागरिकांनी पुराच्या धडकीने धास्ती घेतली आहे. गेवराई प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, वरिल धरणाच्या पाण्याची आवक बघता गोदावरीतील पाणी विसर्ग कमी-जास्त होईल असे गेवराई प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
या गावातील नागरिकांनी घेतली पुराची धडकीगुळज,पाथरवाला बुद्रुक, सावळेश्वर, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, काठोडा, राहेरी,पांढरी, पांगुळगाव,गंगावाडी, गोपत पिंपळगाव,ढालेगाव, भोगलगाव, राजापूर, मनुबाई जवळा,रामपुरी, श्रीपत अंतरवाला,तपेनिमगाव
Maratha Reservation: मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण कशासाठी?; कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा युक्तिवाददोन दिवसापासून परतीचा पाऊस सुरु झाल्याने जायकवाडीच्या वरिल धरणातून पाण्याची आवक वाढली आहे.यामुळे गोदावरी नदीच्या पात्रातुन जवळपास पाऊण लाखाहून आधिक क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात येत असून, पाणी विसर्ग कमी जास्त होण्याच्या शक्यतेने गोदावरी नदीच्या काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे.
संजय सोनवणे, नायब तहसीलदार, गेवराई.