एक वाटी- सुके खोबरे किसलेले
अर्धा वाटी- पिठी साखर
दोन चमचे- साजूक तूप
काजू
बदाम
बेदाणे
अर्धा चमचा- वेलची पावडर
अर्धा चमचा-खसखस
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 गणपती बाप्पाला नैवेद्यात बनवा पारंपारिक पदार्थ पुरण पोळी
कृती-
सर्वात आधी एका कढईत मंद आचेवर सुके खोबरे हलके गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. यामुळे खोबऱ्याचा सुगंध येईल. भाजलेले खोबरे एका बाजूला थंड होण्यासाठी ठेवा. त्याच कढईत अर्धा चमचा तूप गरम करा. त्यात काजू, बदाम आणि बेदाणे हलकेसे परतून घ्या. परतलेला सुकामेवा थंड होण्यासाठी बाजूला काढा.खसखस सुद्धा हलकीशी भाजून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झालेल्या खोबऱ्यात पिठी साखर परतलेला सुकामेवा, वेलची पावडर आणि खसखस घाला. सर्व साहित्य एकत्र चांगले मिसळा. मिश्रण नीट एकजीव झाल्यावर तयार खिरापत बाऊलमध्ये काढा. व नैवेद्यात ठेऊन सर्वांना प्रसाद स्वरूपात द्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 स्वादिष्ट प्रसाद श्रीखंड, गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 चविष्ट मोदक आणि स्वादिष्ट प्रसाद,गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी