दहावी-बारावीच्या फॉर्म १७ अर्जाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली.
फॉर्म १७ द्वारे खासगी विद्यार्थ्यांना थेट परीक्षा देता येणार आहे.
अर्ज ऑनलाईन भरून प्रिंटआऊट काढणे आवश्यक.
अर्जासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, फोटो व शुल्क आवश्यक.
फॉर्म १७ द्वारे दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे खासगिरित्या फॉर्म १७ भरून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या नाव नोंदणीला मुदत वाढ मिळाली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर म्हणजे १५ सप्टेंबरपूर्वी अर्ज भरावा.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या १७ नंबर परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरता येणार आहे. आधी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. आता १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. १११० रुपये परीक्षा शुल्क भरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.
SSC Exam Result : लातूर पॅटर्नचा डंका कायम; ११३ विद्यार्थ्यांनी मिळविले १०० टक्के, बदलापूर पालिकेच्या सर्व शाळांचा १०० टक्के निकालमहत्वाचे म्हणजे ही परीक्षा त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते जे नियमित शाळेत जाऊ शकत नाही किंवा शिक्षण घेऊ शकत नाहीत. ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे असे विद्यार्थी ही परीक्षा देऊन आपले शैक्षणिक वर्ष पूर्ण करतात. फॉर्म १७ भरण्यासाठी विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http://www.mahahsscboard.in वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
HSC Exam Result : निकाल पाहताच विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल; बारावीत कमी गुण मिळाल्याने जळगाव जिल्ह्यात दोघांची आत्महत्याफॉर्म १७ भरून विद्यार्थ्यांना डायरेक्ट दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार आहे. यासाठी त्यांना शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत, ती नसेल तर द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. हा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना १११० रुपये नोंदणी शुल्क, प्रक्रिया शुल्क १०० आणि विलंब शुल्क १०० रुपये भरावे लागणार आहेत. फार्म १७ भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे.
12th HSC Result: वाह रं पठ्ठ्या! सांगलीच्या पोराला प्रत्येक विषयात ३५ गुण, मार्कशीट सोशल मीडियात व्हायरल