आझाद मैदानात मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पावसामुळे आझाद मैदानात चिखल झाला आहे; पण पावसाला न जुमानता आंदोलक मैदानात ठिय्या देऊन होते. दुपारी मनोज जरांगे यांचे भाषण सुरू झाले आणि पाऊस सुरू झाला; पण पावसाला न जुमानता आंदोलक पावसात भिजत भाषण ऐकत उभे होते. मराठय़ांचे वादळ मुंबईत आले आहे, आम्ही पावसाला जुमानणार नाही, असे साताऱयाहून आलेले बाळू घोडके यांनी सांगितले.