दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर टी 20I मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकून ऑस्ट्रेलियाचा हिशोब केला. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिका इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने पंरपरेनुसार 24 तासांआधी पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 2 सप्टेंबरला हेडिंग्ले लीड्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
हेडिंग्लेमधील खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. ही खेळपट्टी कायमच वेगवान गोलंदाजांसाठी मदतशीर ठरली आहे. त्यामुळे या मैदानात गोलंदाजांच्या कामगिरीकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 71 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 71 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 35 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने 30 सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. उभयसंघातील एक सामना बरोबरीत राहिला. तर 5 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
पहिला सामना, मंगळवार, 2 सप्टेंबर, लीड्स
दुसरा सामना, गुरुवार, 4 सप्टेंबर, लॉर्ड्स
तिसरा आणि अंतिम सामना, रविवार, 7 सप्टेंबर, साऊथम्पटन
पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कॅप्टन), जेमी स्मिथ, बेन डकेट, जो रूट, जोस बटलर, जेकब बेथेल, विल जॅक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि सन्नी बेकर.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम, रियान रिकेल्टन (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेव्हीस, वियान मुल्डर, केशव महाराज, कॉर्बिन बॉश, कगिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.