राहुल द्रविडने IPL 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्ससोबतचं नातं संपवलं.
२०२५ मध्ये RR फक्त ४ सामने जिंकून नवव्या क्रमांकावर राहिला.
एबी डिव्हिलियर्सच्या मते राजस्थानने द्रविडला हाकलून लावलं.
Why was Rahul Dravid removed from Rajasthan Royals? भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ पूर्वी राजस्थान रॉयल्ससोबतचं नातं संपुष्टात आणले. मागच्या वर्षी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर RR ने द्रविडची फ्रँचायझीच्या प्रशिक्षकपदी नयुक्ती केली. पण, मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिल्याच पर्वात राजस्थानला समाधानकारक कामगिरी करता आली नाही आणि आयपीएल २०२५च्या गुणतालिकेत ते नवव्या क्रमांकावर राहिले. त्यांना १४ पैकी फक्त चार विजय मिळवता आले.
आता द्रविड आणि राजस्थान यांच्यातलं नातं तुटल्याची बातमी समोर येताच चर्चा होणे साहजिक आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक व कर्णधार एब डिव्हिलियर्सने या बातमीवर धक्कादायक विधान केले आहे. दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या माजी खेळाडूच्या मते राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविडला हाकलले आहे. त्याने फ्रँचायझीने दिलेली मोठी भूमिका स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हा निर्णय घेतला गेला.
Asia Cup 2025 : १ शतक, ३ अर्धशतकं... फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसन देतोय शुभमन गिलला टक्कर; कोण असेल भारताचा ओपनर?डिव्हिलियर्स आपल्या सोशल मीडिया शो 360 LIVE वर म्हणाला, “हा मालक किंवा मॅनेजमेंटने घेतलेल्या निर्णयासारखा वाटतोय. त्यांनी द्रविडला मोठी भूमिका दिली, पण त्याने ती नाकारली. त्याला संघाच्या डगआउटमध्ये राहून योगदान द्यायचं होतं आणि त्यामुळे कदाचित तो नाराज होता. पण, शेवटी निर्णय त्याच्याच हातात होता. भविष्यात द्रविड स्वतः याबद्दल बोलेल तेव्हा खरं काय ते समोर येईल.”
तो पुढे म्हणाला, “फुटबॉलच्या प्रीमियर लीगमध्येही आपण पाहतो, की मॅनेजर्सवर आणि प्रशिक्षकांवर सतत चांगली कामगिरी करून ट्रॉफी जिंकण्याचा दबाव असतो. आणि जेव्हा ते अपयशी होतात, तेव्हा मालकांकडून दबाव येतो. तसंच कदाचित इथेही झालं असेल. द्रविडने नवी भूमिका नाकारली आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याला बाहेर काढलं गेलं.”
१९ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! न्यूझीलंडच्या यष्टिरक्षकाची रेकॉर्ड ब्रेकींग फटकेबाजी; आंद्रे रसेलच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरीडिव्हिलियर्सने राजस्थानच्या २०२५ च्या लिलावातील कामगिरीवरही नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते, “राजस्थानने काही मोठे खेळाडू सोडले, ज्यामध्ये जॉस बटलरसारख्या दिग्गजाचाही समावेश होता. मला वाटतं ही मोठी चूक होती. एक-दोन खेळाडू सोडणं चालतं, पण त्यांनी एकदम मोठ्या प्रमाणावर बदल केले, तर संघाची पिछेहाट होते.”
FAQsप्र. 1: राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समधून का बाहेर पडला?
उ: कमी कामगिरी, मोठी भूमिका स्वीकारण्यास नकार आणि मॅनेजमेंटचा दबाव हे प्रमुख कारण होतं.
प्र. 2: IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी कशी होती?
उ: राजस्थान नवव्या स्थानावर राहिला आणि १४ पैकी फक्त ४ सामने जिंकला.
प्र. 3: एबी डिव्हिलियर्सने काय विधान केलं?
उ: डिव्हिलियर्सच्या मते द्रविडला राजस्थान रॉयल्सने "किक आउट" केलं.
प्र. 4: द्रविडने राजस्थानची नवी भूमिका का नाकारली?
उ: त्याला संघाच्या डगआउटमध्ये राहून थेट योगदान द्यायचं होतं, पण फ्रँचायझीची भूमिका वेगळी होती.
प्र. 5: डिव्हिलियर्सने कोणत्या खेळाडूंना सोडल्यावर टीका केली?
उ: जॉस बटलरसारख्या मोठ्या खेळाडूंना सोडणं ही मोठी चूक असल्याचं त्याने म्हटलं.
प्र. 6: हा निर्णय फुटबॉल प्रीमियर लीगशी का तुलना केला?
उ: फुटबॉलमध्येही मॅनेजर्सवर सतत ट्रॉफी जिंकण्याचा दबाव असतो, तसंच इथेही झालं.