आळंदी, ता. ३ : पोलिस ठाणे हद्दीत गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद (महम्मद पैगंबर जयंती) अनुषंगाने आळंदी शहर, मरकळ गावामध्ये पोलिसांचे पथ संचालन करण्यात आले.
पोलिस उपआयुक्त बापू बांगर आणि साहाय्यक पोलिस आयुक्त सचिन कदम यांच्या उपस्थितीमध्ये आळंदी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगरपरिषद, महाद्वार, घुंडरेआळी, वडगाव, मरकळ, विठ्ठल रुक्मिणी चौकांसह पोलिस ठाणे या मार्गांवर पोलिसांचे पथसंचलन झाले. त्यानंतर मरकळ गावात मारुती चौक, श्री गणेश मंदिर, शाही मज्जिद, दत्तमंदिर- वर्पे तालीम- परत मुख्य मारुती चौक असे पथसंचलन घेण्यात आला. या वेळी आळंदीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, पाच सहायक पोलिस निरीक्षक, ५० अंमलदार, चाकणचे १० अधिकारी, ३० अंमलदार, महाळुंगे इंगळे एमआयडीसीचे नऊ अधिकारी, ४० अंमलदार, १९ जवान, १० होमगार्ड उपस्थित होते, असे आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. नरके यांनी सांगितले.