श्रीसमर्थ चरण पादुका प्रचार दौरा
ठाणे, ता. ३ : श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या वतीने ‘श्रीसमर्थ चरण पादुका प्रचार दौरा २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात काकड आरती, महापूजा, पारायण तसेच मकरंद बुवा रामदासी यांचे कीर्तन होईल. हा कार्यक्रम बुधवार (ता. १०) ते शुक्रवार (ता. १९)पर्यंत सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत गोखले मंगल कार्यालय, विष्णूनगर, नौपाडा, ठाणे (प.) येथे होणार आहे.