इलॉन मस्क यांच्या xAI कंपनीत माजी इंजिनिअर शूचेन लीवर गोपनीय माहिती चोरल्याचा आरोप आहे.
लीने "Grok" चॅटबॉटशी संबंधित माहिती OpenAI ला पुरवल्याचा संशय असून प्रकरण कॅलिफोर्निया न्यायालयात पोहोचले आहे.
Grok हा ChatGPT पेक्षा अधिक प्रगत असल्याचा दावा कंपनी करते.
Elon Musk xAI: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपनी xAI मध्ये मोठ्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतील माजी इंजिनिअर शूचेन ली (Xuechen Li) यानेच ही गोपनीय माहिती चोरल्याचा आरोप कंपनीने केला आहे. याप्रकरणी कॅलिफोर्नियातील न्यायालयात मागील आठवड्यात केस दाखल करण्यात आली.
काय आहे प्रकरण?xAI आणि OpenAI यांच्यात टॅलेंटसाठी स्पर्धा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शूचेन लीवर आरोप आहे की त्याने xAI च्या "Grok" चॅटबॉटशी संबंधित गुप्त माहिती चोरली आणि ती OpenAI ला पुरवली. Grok हा ChatGPT पेक्षा अधिक प्रगत असल्याचा दावा कंपनी करते.
Online Gaming Bill: ही कंपनी आपल्या 60 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; सीईओ म्हणाले- 'आता पर्याय नाही...' कंपनीचे आरोपकंपनीचा आरोप आहे की लीने जुलै महिन्यात OpenAI कडून जॉब ऑफर मिळाल्यानंतर आणि xAI चे सुमारे 7 मिलियन डॉलर किमतीचे शेअर्सविकल्यानंतर संवेदनशील माहिती लीक केली. त्याने xAI कडून दिलेल्या लॅपटॉपमधील दस्तऐवज वैयक्तिक सिस्टमवर कॉपी केल्याचेही सांगण्यात आले आहे.
xAI चे म्हणणे आहे की लीक झालेल्या माहितीच्या आधारे OpenAI आपला ChatGPT अधिक सक्षम करू शकेल आणि त्यामुळे संशोधनावरचा त्यांचा अब्जावधी डॉलरचा खर्च होणार नाही व वर्षानुवर्षांची मेहनत कमी होणार आहे.
Rule Change 1 September: आजपासून बदलले 5 मोठे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणामकंपनीच्यातक्रारीनुसार, 14 ऑगस्ट रोजी झालेल्या एका बैठकीत लीने फाइल्स चोरल्याचे मान्य केले आणि आपले कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या डिव्हाईसमध्ये नंतरही काही अतिरिक्त चोरीचा कंटेंट आढळल्याचा दावा xAI ने केला आहे. त्यामुळे लीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी आणि त्याला OpenAI मध्ये नोकरी मिळू नये, अशी मागणी कंपनीने न्यायालयाकडे केली आहे.
FAQsQ1. xAI कंपनीत चोरीचा आरोप कुणावर आहे?
मराठी: शूचेन ली नावाच्या माजी इंजिनिअरवर हा आरोप आहे.
English: The accused is Xuechen Li, a former engineer at xAI.
Q2. चोरीत कोणती माहिती लीक झाली असल्याचा आरोप आहे?
मराठी: "Grok" चॅटबॉटशी संबंधित गोपनीय माहिती चोरल्याचे सांगितले जात आहे.
English: The allegations involve confidential data related to the "Grok" chatbot.
Q3. ही केस कुठे दाखल झाली आहे?
मराठी: कॅलिफोर्नियातील न्यायालयात केस दाखल झाली आहे.
English: The case has been filed in a California court.
Q4. xAI कंपनीने काय मागणी केली आहे?
मराठी: कंपनीने लीला OpenAI मध्ये नोकरी करण्यास बंदी घालण्याची आणि नुकसानभरपाई मिळवण्याची मागणी केली आहे.
English: xAI wants the court to bar Li from joining OpenAI and to award damages.
Q5. कंपनीचा दावा काय आहे?
मराठी: लीक झालेल्या माहितीद्वारे OpenAI अब्जावधी डॉलर खर्च होणारे संशोधन व विकास टाळू शकते.
English: xAI claims the leaked data could save OpenAI billions in research and development.