प्रत्येक शेअरवर थेट 20 रुपयांचा Dividend! फायदा घेण्यासाठी आज शेवटचा दिवस; कृषी यंत्रसामग्री क्षेत्रात कंपनीचा व्यवसाय
मुंबई : व्हीएसटी टिलर्स अँड ट्रॅक्टर्स कंपनीचे शेअर्स सोमवार, 1 सप्टेंबरपासून गुंतवणुकदारांच्या रडारवर आहेत. त्याचे कारणही तसे खास आहे. कारण कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 साठी जारी केलेल्या अंतिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख जवळ येऊन ठेपली आहे. कंपनीने भागधारकांना प्रति शेअर 20 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. लाभांश मिळवण्यासाठी आज, 2 सप्टेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट असल्याने ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात आज शेअर्स आहेत, त्यांनाच हा लाभ मिळेल. उद्यापासून, 3 सप्टेंबर 2025 पासून, शेअर्स एक्स-डिव्हिडंड होतील. सोमवारच्या व्यवहाराअंती कंपनीचे शेअर्स 5,443.00 रुपयांवर बंद झाले होते, ज्यात 2.92% ची वाढ दिसून आली. कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन 4,704.58 कोटी रुपये आहे.
आर्थिक कामगिरीचा आढावाकंपनीच्या आर्थिक कामगिरीवर नजर टाकल्यास, महसूल आणि नफ्यामध्ये चढ-उतार दिसून येतो. जून 2024 मध्ये 190.59 कोटी असलेला महसूल सप्टेंबर 2024 मध्ये 283.43 कोटींवर पोहोचला, तर जून 2025 मध्ये तो 282.45 कोटी रुपये होता. निव्वळ नफ्यामध्येही अशीच स्थिती आहे. जून 2024 मध्ये 22.85 कोटी असलेला नफा डिसेंबर 2024 मध्ये 1.52 कोटी रुपयांपर्यंत घसरला होता, जो जून 2025 मध्ये 44.56 कोटी रुपयांपर्यंत वाढला. वार्षिक आधारावर, 2025 मध्ये कंपनीचा महसूल 994.55 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 94.46 कोटी रुपये होता.
महत्त्वाचे आर्थिक गुणोत्तरकंपनीची आर्थिक स्थिती तपासण्यासाठी काही महत्त्वाच्या गुणोत्तरांची माहिती घेतल्यास, मार्च 2025 पर्यंत व्हीएसटी टिलर्स अँड ट्रॅक्टर्सचा कर्ज ते इक्विटी प्रमाण 0.00 होते, याचा अर्थ कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.
कंपनीच्या शेअर्सची कामगिरीमंगळवारी, 2 सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 5470 रुपयांवर ट्रेड करीत आहे. तर गेल्या महिन्यात त्यात 18 टक्के गेल्या 6 महिन्यात 70 टक्के आणि गेल्या 5 वर्षात 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5519 रुपये तर नीचांक 3082 रुपये इतका आहे. कंपनीचे बाजार भांडवल 4,703.72 कोटी इतके आहे.
VST Tillers & Tractors Ltd. ही एक अग्रगण्य भारतीय कृषी यंत्रसामग्री कंपनी आहे जी पॉवर टिलर्स आणि कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर्सचे निर्माण आणि विक्री करते.