पाचोरा: शहर व तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदान घोटाळा उघड झाला असून, तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील कार्यालयातील दोघांविरुद्ध एक कोटी २१ लाखांचे शासकीय अनुदान गैरव्यवहार व हेराफेरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे मिळालेल्या अनुदानाची रक्कम मूळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न करता, ती इतरांच्या नावे जमा करण्यात आली. याबाबत लाभार्थी शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे अनुदानाची मागणी करीत तक्रारी केल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी आपल्या नावे आलेले अनुदान दुसऱ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्ग झाल्याचे पुरावे तहसीलदारांसह माध्यम प्रतिनिधींकडे दिले होते. त्यामुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले.
आजपासून उपोषण
अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला, तरी या प्रकरणाची २०१९ पासून सखोल चौकशी व्हावी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे, एसआयटी अथवा आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी व्हावी, चुकीच्या खात्यात वर्ग केलेले अनुदान मूळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे, अनुदान वाटपाची ‘पीडीएफ’ यादी प्रसिद्ध करावी, या मागील मास्टरमाइंड व संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा आदी मागण्यांसाठी सोमवारपासून (ता. १) संदीप महाजन तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
Maratha Reservation:'जेवण घेऊन जाणारी वाहने पोलिसांनी रोखली'; मुंबई येथे माजी आमदार विक्रम सावंत, पोलिसांच्यामध्ये वादत्यामुळे यातून कोणते मासे गळाला लागतात व हे प्रकरण किती कोटीपर्यंत जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, तहसीलदार बनसोडे यांनी संशयित अमोल भोई व गणेश चव्हाण यांचा निलंबनाचा, तसेच विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.