गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा तापला आहे. मराठी विरुद्ध हिंदी असा वाद अनेकदा झाल्याचं दिसून आलंय. राज्यात फडणवीस यांच्या सरकारनं त्रिभाषा धोरण शाळांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्यानंतर फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेत त्रिभाषा धोरण लागू करण्याचा निर्णय मागे घेतला होता. दरम्यान, मराठी विरुद्ध हिंदी असा वाद अधेमधे उफाळून येतो. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पनवेलमधला हा व्हिडीओ असून यात मराठी बोलण्याचा आग्रह करताच भडकलेल्या हिंदी भाषिकाने मरेपर्यंत मराठी बोलणार नाही असं सांगितलं.
गणेश उत्सवावरून वाद सुरू झाला होता. त्यावेळी विजय चंदेल यांना एक महिला मराठीत बोलण्यास सांगते. यात महिला म्हणते की मराठीत बोला. यावर विजय चंदेल यांनी मी हिंदीतच बोलतो आणि हिंदीच बोलणार असं स्पष्ट सांगितलं. त्यानंतर महिलेसह तिचे सहकारी कारमधून खाली उतरतात आणि महाराष्ट्रात राहताय तर मराठीच बोलावं लागेल असं दरडावून सांगितलं.
आंदोलन थांबवण्याचे आदेश द्या, सरकारची कोर्टात विनंती, सदावर्तेंनीही केले गंभीर आरोप; हायकोर्टानं जरांगेंना पाठवली नोटीसमहिलेनं पोलीस आल्यावर त्यांना सांगा असं सांगितलं. यानंतर विजय चंदेल यांना महिलेनं म्हटलं की, तुम्ही महाराष्ट्रात राहताय. आमच्या संस्कृतीचा आदर करा आणि मराठीत बोला. महिलेनं असं म्हणताच विजय चंदेल यांनी मी महाराष्ट्राचा आदर करतो पण मला मराठी बोलायला भाग पाडू शकत नाही असं सांगितलं.
विजय चंदेल यांनी म्हटलं की, मी हिंदी बोलतो, भारताची भाषा हिंदी आहे आणि हिंदीतच बोलणार. भारतात केवळ हिंदीतच बोलेन. मराठीत मी बोलत नाही आणि बोलणारसुद्धा नाही. मरेपर्यंत हिंदीतच बोलेन असं स्पष्ट शब्दात विजय चंदेल यांनी सांगितलं.
विजय चंदेल हे ट्रॅव्हल व्लॉगर आहेत. त्यांचा मराठी-हिंदीवरून वादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही बाजूनी पोलिसांशी संपर्क कऱण्यात आलेला नाही. तसंच कुणीही माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली नाही. पण व्हिडीओ मात्र सध्या चर्चेत आला आहे.