आधी प्रमोशनचं प्रॉमीस, मग दिला नकार, संतापलेल्या महिलेने कंपनीच विकत घेतली आणि बॉसला..
Tv9 Marathi September 03, 2025 04:45 AM

आपण मनापासून काम करतो, कठोर मेहनत करतो. त्याचं फळ मिळावं असं प्रत्येकाला वाटतं, प्रमोशन, पगारवाढ ही सर्वांनाच हवीहवीशी असते. पण ते प्रमोशन मिळण्याची अपेक्षाा असतानाच, जेवहा नाकारलं जात तेव्हा कोणालाही दु:ख होणं साहजिकच आहे. मात्र अशावेळेला तो कर्मचारी काहीच करू शकत नाही. पण प्रमोशन न मिळाल्याने एका महिला कर्मचाऱ्याने अलीकडेच जे पाऊल उचललं ते खूप धक्कादायक होतं. तिने जे केलं त्याने सगळेच हादरले, पण तिच्या या बोल्ड मूव्हची खूप चर्चाही सुरू

प्रत्यक्षात, जेव्हा या महिलेला पदोन्नती मिळाली नाही तेव्हा तिने संपूर्ण कंपनी विकत घेतली आणि तिच्या बॉसला काढून टाकले. झालं असं की त्या महिला कर्मचाऱ्याला Applebees कंपनीत CEO पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण नंतर ते नाकारण्यात आले. काही वर्षांनी, त्या महिलेने संपूर्ण Applebees कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेताल आणि सगळ्यात धक्कादायक पाऊल उचललं, ते म्हणजे ज्या बॉसने तिला प्रमोशन देण्यास नकार दिला, तिने त्यालाच काढून टाकलं ना राव !

सीईओ बनवण्याचं मिळालं होतं आश्वासन

Peopleच्या एका रिपोर्टनुसार, सीरियल इंटरप्रिनिअ आणि रेस्टोरेंट ग्रुप एग्झीक्यूटिव्ह असलेल्या ज्यूलिया स्टीव्हर्टने एका पॉडकास्टमध्ये हा अनुभव सांगितला. ती आधी Applebees कंपनीची प्रेसिडेंट होती तेव्हा तिला अंस वचन देण्यात आलं होतं की जर तिने कंपनीला फायदा मिळवून दिला तर तिला सीईओ बनवण्यात येईल.

स्टीव्हर्टने सांगितलं की की तिने एक नवीन टीम तयार केली आणि कंपनीला पुढे नेण्यासाठी दिवसरात्र काम केले. स्टीवर्टने तीन वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर कंपनीला नफाही मिळवून दिला. वचन दिल्याप्रमाणे, जेव्हा स्टीवर्टन सीईओंना प्रमोशनबद्दल विचारणा केली तेव्हा मात्र सीईओने शब्द फिरवला आणि प्रमोशनसाठी नकार दिला.

खोट्या आश्वासनानंतर केलं रिझाईन

तिने जेव्हा प्रमोशन न मिळण्याचं कारण विचारलं तेव्हा तिला तेही सांगण्यात आले नाही. या सर्व गोष्टींमुळे, स्टीवर्टने अ‍ॅपलबीजमधून राजीनामा दिला आणि IHOP (इंटरनॅशनल हाउस ऑफ पॅनकेक) मध्ये सामील झाली. त्यानंतर तिने आयएचओपीमध्ये पाच वर्षे काम केले आणि कंपनीत यश मिळाल्यानंतर तिने संचालक मंडळाला दुसरी कंपनी खरेदी करण्याचा सल्ला दिला.

कंपनी विकत घेऊन बॉसची केली हकालपट्टी

दुसरी कंपनी खरेदी करण्याच्या वेळी तिला कल्पना सुचली की ती तिची जुनी कंपनी, अ‍ॅपलबीज, खरेदी करू शकते. विचार करायला लावला. बराच विचार केल्यानंतर, आयएचओपीने अ‍ॅपलबीज 2.3 अब्ज डॉलर्सना विकत घेतलं.त्यानंतर स्टीवर्टने तिचा माजी बॉस, अ‍ॅपलबीचा सीईओ, ज्याने तिला सीईओ बनवण्याचे खोटे आश्वासन दिले होते, त्यालाच काढून टाकले.

डाइन ब्रँड्स ग्लोबलची माजी अध्यक्ष आणि सीईओ स्टीव्हर्ट ही 70 वर्षांची आहे, पण अजूनही कार्यरत आहे. सध्या त्या बोजंगल्स आणि इतर अनेक ठिकाणी बोर्ड सदस्य म्हणून काम करतात. याशिवाय, स्टीवर्ट एका वेलनेस अॅपचे संस्थापक देखील आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.