गणेशोत्सवात ठाकरे गटाचा रोजगार मेळावा
कल्याण ता. १ (वार्ताहर) : ठाकरे पक्षाचे विधानसभा सहसंघटक रूपेश भोईर यांनी गणेशोत्सवानिमित्त रोजगार मेळावा आयोजित केला आहे. पीएसएन सप्लाय चैन प्रा. लिमिटेड यांच्या माध्यमातून ॲमेझोन कंपनीत नोकरीसाठी शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे मूकबधिर लोकांनासुद्धा नोकरी मिळेल, अशी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. ४) आयोजित रोजगार शिबिराबाबत माहिती देताना रूपेश भोईर यांनी म्हणाले की, गणपती उत्सवात आम्ही काही गरजू लोकांना रोजगार देण्यात यशस्वी झालो तर आमची भक्ती सफल झाली. रोजगार शिबिर कल्याण पश्चिमेतील सर्वोदय मॉल येथे आयोजित करण्यात आला असून, गरजू लोकांनी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.