इंग्लंडचा अष्टपैलू जेमी ओव्हर्टनने रेड-बॉल क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला.
त्याने आजवर ९९ फर्स्ट-क्लास सामने आणि २ कसोटी सामने खेळले आहेत.
ओव्हर्टनने कसोटी पदार्पण २३ जून २०२२ रोजी केले आणि शेवटचा सामना भारताविरुद्ध ३१ ऑगस्ट २०२५ रोजी खेळला.
Jamie Overton England all-rounder Test career updates : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हर्टन याने अनिश्चित काळासाठी रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. ९९ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या ओव्हर्टनने सोमरसेट व सरे या क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे आणि इंग्लंड संघाकडून दोन कसोटी सामने खेळले आहेत. २३ जून २०२२ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतर दुसरा सामना तो ३१ ऑगस्ट २०२५ मध्ये भारताविरुद्ध खेळला. त्याच्या ब्रेकच्या निर्णयाचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
जेमी ओव्हर्टन म्हणाला, "बराच विचार केल्यानंतर मी रेड-बॉल क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला ९९ फर्स्ट-क्लास सामने आणि इंग्लंडकडून २ कसोटी सामने खेळण्याचा मान मिळाला, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. रेड-बॉल क्रिकेटमुळेच माझ्या करिअरची पायाभरणी झाली आणि मला मिळालेल्या सर्व संधींचं दार उघडलं. याच फॉरमॅटमध्ये मी शिकलो, इथूनच माझी स्वप्ने आणि उद्दिष्टे उभी राहिली.''
Rahul Dravid ने राजस्थान रॉयल्सची साथ का सोडली? तीन खेळाडूंमुळे घडलं सर्व रामायण''पण आता क्रिकेटचा वर्षभराचा ताण, शारीरिक आणि मानसिक पातळीवर सर्व फॉरमॅटमध्ये खेळणे शक्य राहिलेले नाही. पुढे माझं लक्ष फक्त व्हाईट-बॉल क्रिकेटकडे असेल आणि मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोच्च पातळीवर खेळण्यासाठी पूर्ण योगदान देत राहीन," असे त्याने पुढे स्पष्ट केले.
१,२२,५६,७३,४००! वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची prize money जाहीर, मागील स्पर्धेच्या तुलनेत २९७ % ने वाढ, विजेत्या संघाला मिळणार...इंग्लंडचे क्रिकेट डायरेक्टर रॉब की म्हणाले, "जेमीचा निर्णय आमच्यासाठी धक्का आहे. तो आमच्या कसोटी योजनांचा भाग होता. पण ही आजच्या क्रिकेट जगाची वस्तुस्थिती आहे. आम्ही त्याचा निर्णय मान्य करतो आणि योग्य वेळी आम्हाला कळवल्याबद्दल आभारी आहोत."
View this post on InstagramA post shared by Jamie Overton (@jamie_overton8)