Rahul Dravid ने राजस्थान रॉयल्सची साथ का सोडली? तीन खेळाडूंमुळे घडलं सर्व रामायण
esakal September 02, 2025 10:45 PM
  • राहुल द्रविड आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक झाले पण संघाने फक्त १४ पैकी ४ सामने जिंकले.

  • RR च्या कमकुवत कामगिरीमुळे संघ नवव्या स्थानावर राहिला.

  • फ्रँचायझीने द्रविडला मोठी भूमिका ऑफर केली होती पण त्यांनी ती नाकारली.

IPL 2025 Rajasthan Royals performance under Rahul Dravid : राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडियाने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने तातडीने आयपीएल २०२५ मध्ये द्रविडची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. पण, एका वर्षाच्या आत दोघांनी एकमेकांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. द्रविडच्या कार्यकाळात RR ला आयपीएल २०२५ मध्ये काही खास कामगिरी करता आली नव्हती. १४ पैकी केवळ ४ सामने जिंकून ते नवव्या क्रमांकावर राहिले.

द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम न राहण्याच्या निर्णयाची घोषणा करताना फ्रँचायझीने सांगितले की,'आम्ही राहुल द्रविड यांना मोठी भूमिका देऊ केली होती, परंतु ती त्यांनी नाकारली.'एका अहवालानुसार राजस्थान रॉयल्समध्ये कर्णधारपदावरून मतमतांतरं होती. संघ व्यवस्थापनात तीन वेगवेगळे प्रस्ताव समोर आले होते. या तीन वेगवेगळ्या गटांमुळे संघाच्या ड्रेसिंगरूममध्ये असंतोष पसरला आणि प्रशिक्षक द्रविड अडचणीत आले.

Rahul Dravid : राजस्थान रॉयल्सने द्रविडला हाकलून लावलं! AB De Villiers चा धक्कादायक दावा; सांगितली Inside Story कर्णधारपदावरून विभिन्न मतं...

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार द्रविडने निर्णय घेण्यापूर्वी फ्रँचायझीचे मालक मनोज बदाळे यांच्यासोबत चर्चा केली होती. बदाळे यांना राजस्थान रॉयल्सच्या माजी कर्णधाराला फ्रँचायझीसोबत कायम ठेवायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी द्रविडला मोठी भूमिका देऊ केली होती, परंतु त्याने नकार दिला.

सॅमसनने राजस्थान फ्रँचायझीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि द्रविडच्या निर्णयामागचं हे प्रमुख कारण सांगितलं जात आहे. सॅमसन मागील पर्वात त्याला दिलेल्या वागणुकीवरून नाराज होता, परंतु याला सर्वस्वी द्रविडच जबाबदार नव्हता. याच रिपोर्ट मध्ये असेही म्हटले गेले आहे की, द्रविड व संजू यांच्यातले नाते इतकेही ताणले गेले नव्हते. काही गोष्टींवर त्यांच्यात मतभेद होते.

१,२२,५६,७३,४००! वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची prize money जाहीर, मागील स्पर्धेच्या तुलनेत २९७ % ने वाढ, विजेत्या संघाला मिळणार...

त्याचवेळी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीमध्येही कर्णधारपदावरून तीन मतं होती. काहींना संजूला कर्णधार म्हणून कायम ठेवायचे होते, तर दोन गटांनी रियान पराग व यशस्वी जैस्वाल यांची नावं पुढे केली होती. त्यावरूनही द्रविडने फ्रँचायझी सोडण्याचा निर्णय घेतला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.