अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर छेडून सर्व जगात हाहाकार माजवला आहे. भारतावर त्यांनी आधी 25 टक्के टॅरिफ घोषीत केला आणि रशियाकडून तेल खरेदी केल्याने दंड म्हणून आणखी 25 टक्के एक्स्ट्रा टॅरिफ लावला आहे. अशा प्रकारे भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचे ट्रम्प यांनी घोषीत केले आहे. तर युक्रेन युद्धावरुन रशियावरही अनेक निर्बंध लावले आहेत. तर चीन विरोधात मोठा टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, परंतू अद्याप लावलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी , रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी SCO समिटमध्ये एकत्र बोलणी केली आहेत. भारताने अमेरिकेसोबत अद्याप कोणताही ट्रेड डील केलेला नाही. त्यातच आता रशिया, चीन आणि भारत एकाच व्यासपीठावर आल्याने जगाची नजर याकडे लागली आहे. याच दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज रात्री 11.30 वाजता ( भारतीय वेळेनुसार ) काही तरी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
या संदर्भात असा अंदाज लावला जात आहे की ट्रम्प ट्रेंड संदर्भात कोणतेतरी धोरण वा टॅरिफवर काही मोठी घोषणा करु शकतात. अमेरिकेतील एका कोर्टाने अलिकडेच टॅरिफला बेकायदेशीर ठरवले आहे. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेत दिले होते. ट्रम्प प्रशासनाला आधीच कल्पना होती की टॅरिफ संदर्भात कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात जाऊ शकतो याची कल्पना ट्रम्प प्रशासनाला आधीच होती असा दावा रॉयटर्सच्या बातमीत केला आहे.त्यामुळे ट्रम्प यांनी आधीच प्लान B आधीच रेडी ठेवला होता असे म्हटले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीएत. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर मात्र ते सातत्याने एक्टीव्ह आहेत. तर 79 वर्षी ट्रम्प याच्या प्रकृती संदर्भातही अफवा पसरत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांच्या आरोग्यासंदर्भात अफवा पसरली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल #WhereIsTrump सारख्या हॅश टॅग व्हायरल झाला होता.