रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या अनुभवी जोडीने टी 20I नंतर अवघ्या काही महिन्यांआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे दोघेही फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे दोघांच्या कमबॅककडे क्रिकेट चाहत्यांचं डोळे लागून राहिले आहेत. टीम इंडिया काही आठवड्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला मायदेशात टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी 20 या दोन्ही मालिकांमधून बाहेर व्हावं लागलं आहे. पॅटला दुखापतीमुळे या मालिकांमध्ये खेळता येणार नाही. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघात ऑक्टोबर महिन्यात या दोन्ही मालिकांचा थरार पार पडणार आहे.
पॅटला 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच दुखापतीने ग्रासलं आहे. पॅटला या पाठीच्या दुखापतीमुळे टीम इंडिया विरुद्ध खेळता येणार नाहीय. पॅटला याआधी 2011 साली पहिल्यांदा या दुखापतीचा सामना करावा लागला होता.
न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेतूनही बाहेरपॅटचा न्यूझीलंड विरुद्ध 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी 20I मालिकेतही समावेश करण्यात आलेला नाही. निवड समितीने मंगळवारी 2 सप्टेंबरला न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला. मिचेल मार्श या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आगामी एशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर पॅटच्या अडचणीत आणखी वाढू होऊ नये आणि तो फिट व्हावा, यासाठी त्याला या तिन्ही मालिकांमधून बाहेर ठेवलं आहे. पॅट एशेस सीरिजपर्यंत फिट होईल, असा विश्वास ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला.
एशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा पॅटबाबत मोठा निर्णय
भारताचा ऑस्ट्रेलिया दौराFitness concerns surround Australia’s Test captain ahead of the Ashes 👀
More 👇https://t.co/oIBQo32Hc7
— ICC (@ICC)
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेने होणार आहे. उभयसंघात अनुक्रमे 19, 23 आणि 25 ऑक्टोबरला सामने होणार आहेत. त्यानंतर 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर 29 ऑक्टोबरपासून 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतं वेळापत्रक जाणून घेऊयात.
टी 20I मालिकेचं वेळापत्रकपहिला सामना, बुधवार, 1 ऑक्टोबर, बे ओव्हल
दुसरा सामना, शुक्रवार, 3 ऑक्टोबर, बे ओव्हल
तिसरा सामना, शनिवार, 4 ऑक्टोबर, बे ओव्हल