दक्षिण अफ्रिकेने तीन वनडे सामन्याच्या पहिल्याच सामनयात इंग्लंडचा दारूण पराभव केला. यासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला. कारण दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडला 24.3 षटकात 131 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी मिळालेल्या 132 धावा 20.5 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवामुळे इंग्लंडची त्यांच्याच भूमीत नाचक्की झाली आहे. या सामन्यात एकूण 272 चेंडू टाकले गेले . हे दोन्ही संघांमधील चेंडू टाकण्याच्या बाबतीत दुसरे सर्वात कमी पूर्ण झालेला एकदिवसीय सामना आहे. यापूर्वी 2008 मध्ये नॉटिंगहॅम येथे 223 चेंडू सामना संपला होता. 2007 च्या विश्वचषकात ब्रिजटाऊन येथे झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने 184 चेंडू राखून विजय मिळवला होता. या सामन्यात 7 विकेट आणि 184 चेंडू शिल्लक राहिले.
या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक म्हणाला की, ‘हा काही आदर्श नाही. मालिकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्या वाईट दिवसांपैकी एक आणि आपल्याला शक्य तितक्या लवकर पुढे जावे लागेल. स्मजशिवाय तो वाईट दिवस होता असे प्रत्येकजण आपले हात वर करेल. आम्हाला भागीदारी करता आली नाही. ते खेळपट्टीवर थोडेसे टिकले पण मला जास्त तपशीलात जायचे नाही.’ नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला असता तर काही फरक पडला असता का? तेव्हा हॅरी ब्रूक म्हणाला की, आशा आहे की आम्ही त्यांच्यासारखे गोलंदाजी केली असती, त्यांनी चांगली गोलंदाजी केली.
दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलिया मालिकेतील गती कायम ठेवण्यासाठी, चांगली सुरुवात करणे खूप महत्वाचे होते. आम्ही याबद्दल बोललो. पॉवरप्लेमध्ये त्यांनी आमच्यावर दबाव आणला तरीही आम्ही विकेट घेण्यात यशस्वी झालो. गोलंदाजीच तुम्हाला जास्त चूक करता येईल असे वाटत नाही. बॅटने आम्ही शेवटी थोडे क्लिनिकल असू शकलो असतो. एडेनच्या आक्रमतेमुळे चांगली सुरुवात केली. आम्ही चांगले झेल घेतले. क्षेत्ररक्षणात आम्हाला सुधारणा करायची आहे.’