मराठा आंदोलनादरम्यान मध्य प्रदेशातील तरुण पकडला.
भगवा उपरणं घालून फिरत असल्याने आंदोलकांना संशय.
आंदोलकांनी पोलिसांच्या स्वाधीन केला.
आंदोलनात अनुचित प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप.
मध्य प्रदेशमधून आलेल्या एका तरुणाला मराठ्यांनी पकडले आहे. मध्य प्रदेशातून आलेला हिंदी भाषिक तरुण गळयात भगव्या रंगाचा उपरणं घालून फिरत होता. मराठा बांधवांना संशय येताच त्यांनी तरूणाची विचारपूस केली. तसेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अशी लोक आंदोलनात अनुचित प्रकार घडवून आणत आहेत, असा आंदोलकांचा आरोप आहे.
एक मराठा लाख मराठाम्हणत राज्यभरातून मराठा बांधव मुबंईत एकत्र जमले आहेत. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी हाती घेतला आहे. आझाद मैदानासह दक्षिण मुंबईत मराठा बांधवांमुळे वातावरण भगवामय झालंय. कोर्टानं आणि पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीनंतरही मराठा आंदोलकांमधील आरक्षणासाठी असणारा जोर कायम आहे.
'मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही.. काय व्हायचंय ते..'; मनोज जरांगे पाटलांकडून थेट इशारामात्र, मराठा आंदोलनादरम्यान, मराठा बांधवांनी एका परप्रांतियाला पकडलं. हा परप्रांतिय मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो भगव्या रंगाचं उपरणं घालून फिरत होता. मराठा बांधवांना तरूणाचा संशय आला. त्यांनी तरूणाची विचारपूस केली. तरूण परप्रांतिय असल्याचं समजताच मराठा बांधवांनी त्याला पकडले.
मराठा आंदोलनात घुसखोरी, मध्य प्रदेशच्या तरूणाला मराठ्यांनी पकडले अन्...मराठा बांधवांनी परप्रांतिय तरूणाला पकडून थेट मुंबई पोलिसांकडे नेले. तरूणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. अशी परप्रांतिय लोक मराठा आंदोलनात अनुचित प्रकार घडवून आणतात, असं यावेळी मराठा आंदोलकांनी म्हटलं. सध्या याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Beed: पोलीस दलात खळबळ! निलंबित पोलीस निरिक्षकानं आयुष्य संपवलं, घरात कुणीही नसताना उचललं टोकाचं पाऊल