आज बाजारात रिलायन्स, ईटर्नल, एनटीपीसी, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स टॉप गेनर्स ठरले.
तर अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, इन्फोसिस, M&M आणि एशियन पेंट्स टॉप लूझर्स होते.
सोन्या-चांदीने नवा उच्चांक गाठला आहे.
Stock Market Opening Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने तेजीसह व्यवहार सुरू केले आहेत. सेन्सेक्स 155 अंकांनी वाढून 80,520 वर उघडला. निफ्टीच्या बाबतीतही असेच आहे. तो 28 अंकांनी वाढून 24,653 वर उघडला. बँक निफ्टी 36 अंकांनी वाढून 54,038 वर उघडला. आज सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जवळजवळ सर्व क्षेत्रांचे निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. ज्यामध्ये रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे.
आज शेअर बाजारात टॉप गेनर्समध्ये रिलायन्स, ईटर्नल, एनटीपीसी, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एशियन पेंट्स हे टॉप लूझर्स आहेत.
दरम्यान, चीनमध्ये झालेल्या तिहेरी बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सहभाग घेतला. या बैठकीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरनाराजी व्यक्त करत म्हटले की, भारताने शून्य टॅरिफचा प्रस्ताव दिला होता, पण आता उशीर झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा टॅरिफ संदर्भात अनिश्चितता वाढली आहे.
सोन्या-चांदीने केला नवा विक्रमदेशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीत मोठी तेजी पाहायला मिळाली. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव तब्बल ₹1,000 वाढून ₹1,04,800 च्या वर बंद झाला, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. तर चांदीने ₹1,24,990 वर पोहोचत ऑल टाइम हाय गाठला.
मार्केटचा कल आणि एक्सपायरी बदलआज GIFT निफ्टी 24,750 जवळ स्थिर दिसत आहे. अमेरिकन बाजार सुट्टीमुळे बंद होते. आज भारतीय बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. परंतु सोन्या-चांदीच्या नव्या उच्चांकाकडे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
Elon Musk: मस्कच्या कंपनीत झाली चोरी! चीनच्या इंजिनिअर गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरणFIIs (परदेशी गुंतवणूकदार) यांनी सोमवारी ₹1,430 कोटींची विक्री केली असली, तरी डेरिव्हेटिव्ह्ज आणि इतर सेगमेंटमधील खरेदीमुळे ते एकूण ₹2,280 कोटींचे निव्वळ खरेदीदार ठरले. तर DIIs (स्थानिक गुंतवणूकदार) यांनी सलग पाचव्या दिवशी खरेदी चालू ठेवली आणि ₹4,300 कोटींहून अधिक शेअर्स विकत घेतले.
महत्वाचे म्हणजे, NSE ने निफ्टीआणि बँक निफ्टीची विकली एक्सपायरी गुरुवारवरून बदलून मंगळवारी केली आहे. त्यामुळे ट्रेडर्सना आपल्या पोझिशन्स नव्या नियमांनुसार बदलाव्या लागणार आहेत.
Nestle CEO: ऑफिसमध्ये CEOचे ज्युनियर सोबत अफेअर; मोजावी लागली मोठी किंमत, 913 कोटींची नोकरी गमावली कंपन्या आणि सेक्टरची हालचालहिरो मोटोकॉर्पने ऑगस्टमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली विक्री केली असून, टू-व्हीलर विक्रीत 8% वाढ झाली आहे.
साखर क्षेत्राला मोठा दिलासा देत सरकारने ऊसापासून एथेनॉल उत्पादनास मान्यता दिली आहे.
कापड उद्योगासाठी (टेक्सटाइल सेक्टर) PLI योजनेची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून काही कच्च्या मालाच्या आयातीवर 1.5 वर्षांची सूट मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये SEMICON India 2025 चे उद्घाटन करणार असून, यामुळे Made in India चिप उत्पादनाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
Q1. आज बाजारातील टॉप गेनर्स कोणते?
A1. रिलायन्स, ईटर्नल, एनटीपीसी, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स.
Q1. Who were today’s top gainers?
A1. Reliance, Eternal, NTPC, Bharti Airtel, and Bajaj Finance.
Q2. आजचे टॉप लूझर्स कोणते?
A2. अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एशियन पेंट्स.
Q2. Who were today’s top losers?
A2. UltraTech Cement, Trent, Infosys, M&M, and Asian Paints.
Q3. सोन्या-चांदीचे नवे दर काय आहेत?
A3. सोनं ₹1,04,800 वर पोहोचले तर चांदी ₹1,24,990 वर बंद झाली.
Q3. What are the new gold and silver prices?
A3. Gold closed above ₹1,04,800, and silver touched ₹1,24,990.
Q4. NSEने कोणता मोठा बदल केला आहे?
A4. निफ्टी आणि बँक निफ्टीची विकली एक्सपायरी गुरुवारवरून मंगळवारी केली आहे.
Q4. What major change did NSE announce?
A4. The weekly expiry for Nifty and Bank Nifty has been shifted from Thursday to Tuesday.
Q5. कंपन्या आणि सेक्टरमध्ये कोणत्या हालचाली झाल्या?
A5. हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीत 8% वाढ झाली, साखर क्षेत्राला एथेनॉल उत्पादनास परवानगी मिळाली आणि टेक्सटाईल सेक्टरसाठी PLI योजना वाढवण्यात आली.
Q5. What were the key updates from companies and sectors?
A5. Hero MotoCorp’s sales grew by 8%, the sugar sector got approval for ethanol production, and the textile sector received an extension for the PLI scheme.