Entertainment News : सब टीव्हीवरील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेत आजवर अनेक कलाकारांनी काम केलं आहे. यातीलच एका अभिनेत्रीचा घटस्फोट होतोय. तिने याबाबत स्वतः खुलासा केला.
ही अभिनेत्री आहे सिंपल कौल आहे. पंधरा वर्षांच्या लग्नानंतर सिंपलने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या याबद्दलची प्रक्रिया तिने सुरु केली आहे. तिच्या नवऱ्याचं नाव राहुल लुंबा असून 2010 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर 15 वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
सिंपल कौल याबद्दल माध्यमांना स्पष्टीकरण दिलं आहे. तिने सांगितलं की ही घटना अलीकडेच घडली आहे. परस्पर सहमतीने त्यांनी वेगळं होण्याचा हा निर्णय घेतला आहे. सिंपल कौल असं म्हणाली की राहुल फक्त त्यांच्या कुटूंबाचा भाग नव्हते, ती बराच काळ त्यांना ओळखत होती. लग्नानंतर नवरा कुटूंबाचा महत्त्वाचा भाग असतो आणि ते नातं कधी बदलत नाही. पण लोक वेगळे का राहू लागतात हे ती अजून समजु शकली नाहीये.
सिंपलने लग्न मोडण्याचं खरं कारण उघड केलं नाहीये. पण असं म्हटलं जातंय की ते दोघं बराच काळ वेगळे राहत होते. सुरुवातीला त्यांचा संसार नीट सुरु होता पण नंतर त्यांच्यात अंतर निर्माण झालं.
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल कामानिमित्त दुसरीकडे राहायचा. त्यामुळे त्यांचं लग्न बराच काळ लॉन्ग डिस्टन्स होतं. कदाचित बराच काळ एकमेकांपासून लांब राहिल्याने त्यांच्या लग्नात अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही काळ त्यांनी त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
View this post on InstagramA post shared by Simple Kaul (@simplekaul)
सिंपल फक्त अभिनेत्री नसून बिझनेस वुमनही आहे. तिचे अनेक रेस्टॉरंट्स आहेत. त्यातून ती उत्तम कमाई करत आहे.
सिंपलने तारक मेहतामध्ये जेठालालच्या खोट्या बायकोची गुलाबो ही भूमिका साकारली होती. याशिवाय शरारत या मालिकेत तिने साकारलेली पॅम ही निगेटिव्ह भूमिका खूप गाजली होती.
स्वदेशी अॅक्शन, दमदार भावनेने भरलेले आणि पुरेपूर मनोरंजन असणाऱ्या अनुराग कश्यप यांच्या निशानची चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित