भाजप उपाध्यक्ष डॉ. निमकर
यांच्याकडून छत्र्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी छत्र्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा प्रारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डॉ. निमकर यांनी डोंबिवली येथे केला.
रत्नागिरीत सामान्य व्यक्तींपासून विविध क्षेत्रातील व्यक्तींना छत्री वितरित केली. शहरातील नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आले. रत्नागिरी शहरात भाजप प्रदेश सचिव शिल्पा मराठे, उमेश कुळकर्णी, राजेश तोडणकर, सचिन करमरकर, राजू भाटलेकर, भाजप महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, धनंजय मराठे, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मुन्ना चवंडे, समीर तिवरेकर, संपदा तळेकर, सचिन करमकर, राजन पटवर्धन, राजू भाटलेकर, सतीश सोबळकर, धामणसे ग्रामपंचायतीचे सरपंच अमर रहाटे, मुकुंद जोशी, अनंत जाधव यांच्या हस्ते नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले.
---