नागपूर : उपराजधानीतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत एका सफाई कामगाराने सुसाईड नोट (चिठ्ठी) लिहून घरी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अजय मलिक असे या कामगाराचे नाव आहे. तो सध्या खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटवर आहे. या घटनेमुळे शासकीय दंत महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.
अजयची आई शासकीय दंत महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर वारसा हक्काने अजयला सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली. कोरोनापूर्वी अजय रुजू झाला. बुधवारी (ता.३) सकाळी ११ वाजता पत्नी मुलाला शाळेत घेवून गेली.
गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे ती मधूनच परत आली. पती गळफास घेत असल्याचे दिसले. तिने आरडा-ओरड केली. तत्काळ गळफास काढून त्याला रुग्णालयात दाखल केले. कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय नोकरीवर नियमित नसल्याची माहिती पुढे आली. दोन दिवसांपासून रुजू होण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालयात खेटा घालत होता. मात्र त्याला रुजू करून घेण्यात आले नाही.
शासकीय दंत महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे रुजू होण्यासाठी अजय गेला होता. परंतु त्याची फाईल अधिकाऱ्यांनी अजयच्या अंगावर भिरकावली. यामुळे अजय दुखावला गेला अशी चर्चा दंत वर्तुळात आहे.
सफाई आयोगाने घेतली दखलअजय मलिक या सफाई कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती राज्य सफाई कर्मचारी आयोगापर्यंत पोचली असून या घटनेची दखल घेण्यात आली. गुरुवारी आयोगाचे अध्यक्ष अध्यक्ष सतीश डागोर यासंदर्भात माहिती जाणून घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Nagpur News: शहरातील उड्डाणपुलाखाली तयार होतेय क्रीडांगण; युवकांना आऊटडोअर्स गेम्स खेळण्यासाठी मिळणार प्रेरणा, मनपाचा प्रस्तावशासकीय दंत महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे कानावर आले आहे. हा कर्मचारी कोरोनापूर्वी रुजू झाला. नियमित येत नव्हता. मध्ये कधीतरी येत होता. नेहमीच गैरहजर राहात होता. त्याने प्रशासकीय कार्यालयात सुसाईड नोट लिहन ठेवली यासंदर्बात माहिती नाही.
- डॉ. मंगेश फडनाईक,
अधिष्ठाता , शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.