ओतूरमध्ये सहा ट्रॉली निर्माल्य संकलन
esakal September 08, 2025 12:45 AM

ओतूर, ता. ७ ः ओतूर (ता. जुन्नर) येथे गणेशोत्सवात मांडवी नदी किनारी पर्यावरण संवर्धनासाठी व नदीतील प्रदूषण थांबविण्यासाठी ग्रीन व्हीजन फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांच्यातर्फे निर्माल्य संकलन उपक्रम दरवर्षी राबवला जात आहे. यावर्षी या उपक्रमात सहा ट्रॉली निर्माल्य संकलन झाल्याची माहिती सरपंच डॉ. छाया तांबे व ग्रीन व्हीजन फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष वाळेकर यांनी दिली.
पर्यावरण संवर्धन आणि नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी फाउंडेशन मोठ्या प्रमाणात काम करत आहे. फाउंडेशन फक्त वृक्ष लागवड करत नाही, तर वृक्षांची जोपासना करण्यासाठी काम करते. गेल्या काही वर्षांपासून फाउंडेशनकडून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलनाचा यशस्वी उपक्रम राबविला जात आहे. या वर्षी कपर्दिकेश्वर मंदिर आणि के. टी. बंधारा या ठिकाणी दोन दोन ट्रॉली निर्माल्य संकलित करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या उपक्रमाला ग्रामस्थही दरवर्षी प्रतिसाद देतात. या वर्षी सहा ट्रॉली निर्माल्य संकलन झाले असून, या संकलित निर्माल्याला संजय लांबे यांच्या खतनिर्मिती प्रकल्पास दिले.
या उपक्रमासाठी उपसरपंच प्रशांत डुंबरे, रवी ढमाले, सुजित नलावडे, डॉ. वैभव गायकर, डॉ. रोहिणी गायकर, संतोष डुंबरे, कविता डुंबरे, डॉ. अमित काशीद, डॉ. श्याम गायकर, दीपाली डुंबरे, ज्योती ढमाले, ललिता वाळेकर यांचे व इतरांचे सहकार्य लाभले आहे.

00723

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.