पाळ सरकारने ४ सप्टेंबर २०२५ रोजी एक मोठा निर्णय घेत सोशल साईटवर बंदी लादल्याने तेथील युवकांनी रस्त्यावर उतरुन जाळपोळ सुरु केली आहे. नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सएप, यूट्यूब आणि एक्ससहीत २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रतिबंध लावल्याने नेपाळमधील तरुणांना आगडोंब सुरु केला आहे. काठमांडूत हजारो जनरेशन जेट (Gen Z) चे तरुण रस्त्यांवर उतरले आणि संसदेपर्यंत पोहचले. या काही तरुणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ सरकारने कर्फ्यू लावला असून भारत आणि नेपाळ सीमेवर संशस्र सीमा दलाने टेहळणी सुरु केली आहे. चला तर आणखी कोणत्या देशात सोशल मीडियावर बंदी आहे. एका देशात तर सोशल मीडियाप्रकरणात मृत्यूची शिक्षा आहे. चला त्या देशांची माहिती घेऊयात…
सोशल मीडियावर बंदी लादणारा नेपाळ हा काही पहिला देश नाही. अनेक देशात देखील यासंदर्भात कठोर नियम आहेत. यात पहिले नाव चीनचे येते.
चीनमध्ये सोशल मीडियावर सक्त निर्बंध आहेत. येथे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि एक्स सारखे प्लॅटफॉर्म पूर्णपणे बॅन आहेत. त्यामुळे चीनच्या अंतर्गत भानगडी जगासमोर येत नाहीत. चीनने स्वदेशी प्लॅटफॉर्म्स उदा. व्ही चॅट, आणि डॉयीनला प्रोत्साहन दिले आहे. जर कोणी बंदीचे उल्लंघन केले तर मोठा दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
किम जॉन्ग उन यांच्या उत्तर कोरियात साशल मीडिया आणि इंटरनेटपर्यंत सर्वसामान्यांना बंदी आहे. केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना मर्यादित प्रमाणात इंटरनेटचा वापर करता येतो. येथे सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणे अशक्य आहे आणि बेकायदेशीर कृतीमुळे मृत्युदंड देखील दिला जाऊ शकतो.
इराणमध्ये देखील राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली फेसबुक आणि एक्स तसेट युट्युब सारख्या प्लॅटफॉर्म्सना बंदी आहे. सरकार कठोर सेन्सॉरशिप लागू करते आणि सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात पोस्ट केल्यानंतर कठोर शिक्षा दिली जाते. यात तुरुंगवास किंवा मृत्यदंडाच्या शिक्षेचा समावेश आहे.
अफगाणिस्तान देखील सोशल मीडियावर बंदी आहे. येथे कोणत्याही सजिव वस्तूचा फोटो काढणे आणि त्यास शेअर करणे यावर तालिबानी शिक्षा मिळू शकते.
सौदी अरबमध्ये सोशल मीडियावर सरकारची करडी नजर असते. येथे सरकार विरोधी आणि धार्मिक भावनांना ठेच पोहचवणाऱ्या पोस्टसाठी तुरुंगवास किंवा दंड वा मृत्यूची शिक्षा मिळू शकते. २०२२ मध्ये एका व्यक्तीने ट्वीटरवर सरकार विरोधात पोस्ट केली तर त्याला मृत्यूची शिक्षा देण्यात आली होती.