नेपाळमध्ये स्फोटक स्थिती कायम आहे. डिजिटल सेन्सॉरशिप विरोधात युवा वर्ग रस्त्यावर उतरला आहे. परिस्थिती हिंसक बनली आहे. विरोध प्रदर्शनादरम्यान 21 लोकांचा मृत्यू झाला. 300 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या या संकटाला तिथली आर्थिक परिस्थिती जबाबदार आहे. नेपाळ भारताचा शेजारी देश आहे. नेपाळसोबत भारताचे ऐतिहासिक प्राचीन संबंध आहेत. व्यापाराच्या बाबतीतही नेपाळ बऱ्याच प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. तेलापासून वीजेपर्यंत महत्त्वाच सामान भारतातूनच नेपाळला जातं. आता तिथली परिस्थिती खराब झाल्याने आयात-निर्यातीत बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे नेपाळच्या अडचणी वाढू शकतात. नेपाळ कुठल्या वस्तुंसाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. तिथून कुठलं सामान भारतात येतं? या बद्दल जाणून घ्या.
नेपाळच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलायच झाल्यास ते पूर्णपणे शेती आणि पर्यटनावर अवलंबून आहेत. आवश्यक सामानाच्या आयात-निर्यातीबद्दल बोलायच झाल्यास त्यांच्या एकूण व्यापाराच्या 60 टक्के व्यापार तर भारतासोबतच होतो. म्हणजे बिघडत्या परिस्थितीत पुरवठ्यावर परिणाम झाला, तर नेपाळच्या अडचणी वाढतील. आकड्यांवर नजर टाकल्यास ट्रेडिंग इकोनॉमिक्सनुसार, वर्ष 2024 मध्ये भारताने नेपाळला 6.95 अब्ज डॉलर्सच्या सामानाची निर्यात केली. भारताने नेपाळहून 867 मिलियन डॉलरच सामान आयात केलं.
भारतातून नेपाळला काय-काय पुरवठा होतो?
भारतातून नेपाळला वीजेपासून तेलापर्यंत पुरवठा केला जातो. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (IOCL) नेपाळला तेल निर्यात होते. तिथे तेल वितरणाची जबाबदारी सुद्धा हीच कंपनी संभाळते. त्याशिवाय भारताकडून नेपाळला सवलतीच्या दरात वीज पुरवठा होतो. पेट्रोलियम उत्पादनाशिवाय भारतातून नेपाळला स्टील, लोखंड, ऑटो पार्ट्स आणि औषधांचा देखील पुरवठा केला जातो.
नेपाळहून कुठल्या सामानाची आयात केली?
भारतातून नेपाळला आवश्यक सामानाची निर्यात केली जाते, तसच भारतही नेपाळकडून काही गोष्टींची खरेदी करतो. यात जूट प्रोडक्ट, स्टील, फायबर, लाकडाचं सामान, कॉफी, चहा आणि मसाले यांचा समावेश होतो. मागच्यावर्षीच्या 2024 च्या आकड्यांवर नजर टाकली, तर भारताने नेपाळमधून सर्वात जास्त वनस्पती तेल आणि वसाची आयात केली. त्याशिवाय स्टील (101.10 मिलियन डॉलर), कॉफी-चहा, मसाल्यांची 98.05 मिलियन डॉलरची आयात केली. लाकूड आणि लाकडापासून बनवलेल्या 70.89 मिलियन डॉलर सामानाची आयात करण्यात आली. टेक्सटाइल, फायबर, मीठ, स्टोन सह अन्य वस्तूसुद्धा नेपाळमधून भारतात आल्या.
भारताची भूमिका खूप महत्वाची
नेपाळच्या अर्थव्यवस्थेत भारताची भूमिका खूप महत्वाची आहे. भारताच्या अनेक दिग्गज कंपन्यांचे प्रोजेक्ट नेपाळमध्ये सुरु आहेत. त्या माध्यमातून तिथल्या स्थानिक नागरिकांना रोजगार मिळतो. भारतातून नेपाळी वंशाचे लोक मोठ्या संख्येने तिथे नेपाळमध्ये नोकरीसाठी जातात. नेपाळी कंपन्यांच्या प्रोडक्टसाठी भारत सुद्धा एक मोठी बाजारपेठ आहे. भारतासाठी ही डबल स्ट्राइक सारखी स्थिती आहे. कारण अमेरिकेच्या टॅरिफमुळे आधीच आपली निर्यात तिथे घटली आहे. आता नेपाळमध्ये असाच संघर्ष सुरु राहिल्यास भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊन आर्थिक फटका बसेल.