पुढे झुकलेली मान, लांबडे तोंड, एक्सपर्ट्सच्या मते साल 2050 मध्ये कंटेन्ट क्रिएटर्सची अशी अवस्था ?
Tv9 Marathi September 05, 2025 07:45 PM

आज काल सोशल मीडियावर लाईक्स मिळवणारे इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेन्ट क्रिएटर्स खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. परंतू येत्या काळात त्यांचे प्रभावशाली व्यक्तीत्व हरवणार आहेत.वारंवार हातात मोबाईल घेऊन कंटेन्ट बनवण्यात व्यस्त असणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सचे रुप रंग आणि त्वचेच्या संदर्भात एक मॉडेल तज्ज्ञांनी तयार केले आहे. त्याद्वारे येत्या काळात ते कसे दिसतील याचा एक नमूना म्हणून त्यांनी हे मॉडेल तयार केले आहे.

फोनवर सोशल मीडियावर कंटेन्ट बनवणारे लोक आज भलेही ग्लॅमरस आणि आकर्षक दिसत असले. तरी त्यांचा जलवा फार दिवस टीकणार नाही. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार गॅबलिंग साईट Casino.org वर विशेषतज्ज्ञांनी एक विचित्र AI मॉडल तयार केले आहे. त्यात कंटेन्ट क्रिएटर्स २०५० मध्ये कसे दिसतील. यात त्यांच्या त्वचेवर डाग आणि कुबडे आलेले आणि मानेत सतत दुखत असल्याचे दर्शवले आहे.

जीवनशैलीत मोठा बदल

कंटेन्ट क्रिएशनचे करियर भलेही आकर्षक असले, तरी हे आपल्या आयुष्यात महत्वाचा बदल आणू शकते असे गॅबलिंग तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यांना पाहायचे होते की या ‘ट्रेंडिंग प्रोफेशन’मध्ये लोक ज्यांचे जगभरात ३० – ५० मिलियन फॉलोअर्स होते आणि जे दरवर्षी १० ते २० टक्क्यांनी वाढत आहे. काळ त्यांच्या रंगरुपाला कसे प्रभावित करु शकते.

तज्ज्ञांनी तयार केले भविष्यातील कंटेन्ट क्रिएटरचे AI मॉडेल

एल्गोरिदमचा पाठलाग करणे, सौदर्यमानकाचा दबाव आणि विना थांबता कंटेन्ट निर्माण शरीर आणि मन दोन्हींवर स्पष्टपणे प्रभाव टाकत आहे. यास स्पष्ट करण्यासाठी Casino.org ने एवा नावाने एक भविष्यातील कंटेन्ट क्रिएटरचे एक मॉडेल बनवले आहे. हे मॉडेल सोशल मीडिया युगासाठी ऑस्कर वाइल्डची १८९० ची गॉथिक कथा “द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे” सारखे, वर्षानुवर्षे कंटेन्ट निर्मितीच्या गुंतागुंतीच्या व्यवहार करणाऱ्यांचे डिजिटल प्रतिनिधीत्व आहे.

बराच काळ सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापराने रिंग लाईट्सच्या खाली तासनतास पोझ दिल्याने एआय मॉडेलचे खांदे गोलाकार झालेले दाखवले आहेत. डोके नेहमी पुढे झुकलेले असल्याने माने दुखत आहे. ज्यास टेक नेक म्हटले आहे.इंटरडिसिप्लीनरी न्यूरोसर्जरी वृत्तपत्रात तज्ज्ञांनी लिहीलेय की वारंवार स्मार्टफोनचा वापर केल्याने मानेची स्थिती असंतुलित होऊ शकते. वा मस्कुलोस्केलेटल विकार विकसित होऊ शकतो.

इन्फ्लुएन्सर्स आठवड्यात ९० तास काम करतात

मानेची ही झुकलेली स्थिती मान आणि मणक्यांच्या वेदना वाढवू शकते. त्याच वेळी, त्यामुळे मणक्याच्या आजूबाजूच्या भागात स्नायूंवर देखील ताण येऊ शकतो. हे खूपच चिंताजनक आहे. कारण बीबीसीच्या मते, इन्फ्लुएन्सर्स आठवड्यातून ९० तासांपर्यंत काम करतात, ज्यापैकी बहुतेक तास ते त्यांच्या फोनवर घालवतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.